आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोशन पोस्टर आउट:'छोरी' या हॉरर चित्रपटाची थरकाप उडवणारी झलक, पूजा सावंत स्टारर मराठी चित्रपट ‘लपाछपी’चा आहे हिंदी रिमेक

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशाल फुरिया दिग्दर्शित आणि टी-सिरीज, क्रिप्ट टीव्ही आणि एबंडेंशिया एन्टरटेनमेंट निर्मित अमेझॉन ओरीजनल मुव्ही

अमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांची आगामी हॉरर चित्रपट 'छोरी'ची झलक जगासमोर सादर केली आहे. जर तुम्हाला अंगावर काटा आणणारा अनुभव घ्यायची इच्छा असेल, तर मग हा सिनेमा तुमच्यासाठीच असेल. अमेझॉन ओरीजनल चित्रप​​​​​​​ट 'छोरी' प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज असून यंदा नोव्हेंबर महिन्यात धडकी भरवणाऱ्या अनुभवासाठी तयार रहा.

'छोरी'विषयी:
'छोरी' हा एक भयपट असून तिचे दिग्दर्शन विशाल फुरिया याने केले आहे, तर भूषण कुमार, क्रिशन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा हे निर्माते आहेत. मराठी चित्रपट 'लपाछपी'चा हा रिमेक असून त्यात मुख्य भूमिकेत नुसरत भरूचा आहे. तिच्यासोबत मिता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल आणि यानिया भारद्वाज झळकणार आहेत.

हा सिनेमा भय आणि असामान्य शक्तींवर आधारित असून छोरीकरिता एबंडेंशिया एंटरटेनमेंटच्या ‘साईक’ (हॉरर आणि पॅरानॉर्मल जॉनरवर केंद्रित विभाग) आणि लॉस एंजलिस येथील क्रिप्ट टीव्ही पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. क्रिप्ट टीव्हीने द लुक-सी, द बीर्च, सनी फॅमिली कल्ट आणि द थिंग इन द अपार्टमेंट अशा नवीन भय-पटांची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...