आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मिस यूनिवर्सचा नवा अवतार:हॉट स्टार वेब सीरीज 'आर्या' आता अॅनिमेशनमध्येही, सुष्मिताने  शेअर केला आपला अॅनिमेटेड लूक 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुष्मिता सेनने तिच्या सुपरहिट वेब सीरीज आर्यची अॅनिमेटेड क्लिप शेअर केली आहे. यामध्ये, वेब सीरिजची कहाणी अ‍ॅनिमेशनमध्ये री-इमेजिन केली गेली आहे आणि एका मनोरंजक मार्गाने दाखवली आहे. व्हिडिओमध्ये आर्याला योद्धासारख्या सर्व अडचणींना तोंड देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

व्हिडिओ बॅकग्राउंडमध्ये शरद केळकरचा आवाज आहे. या सीरीजमध्ये, सुष्मिताने आर्या नावाच्या एका महिलेची भूमिका केली आहे जी पतीच्या निधनानंतर (चंद्रचूड सिंग) कुटुंब वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. 

डच सीरीजचा रिमेक आहे आर्या 

आर्य या सीरीजचे दिग्दर्शक आणि लेखक राम माधवानी आहेत. ही सीरीज डच सीरीज पेनोझाची रिमेक आहे. आर्यच्या सीजनच्या सुपर यशानंतर राम माधवानी आता दुसर्‍या सीजनवर काम करत आहे.

अखेरच्या वेळी दिसली 'निर्बाक'मध्ये 
सुष्मिताचा शेवटचा चित्रपट निर्बाक हा होता. हा 2015 मध्ये रिलीज झाला होता. हा एक बंगाली चित्रपट होता. जवळपास दहा वर्षांपूर्वी सुष्मिता बॉलिवूडच्या चित्रपटात दिसली आहे. चित्रपटाचे नाव नो प्रॉब्लम होते. 2010 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे डायरेक्टर अनीस बज्मी होते. 

मुलींच्या संगोपनासाठी घेतला होता ब्रेक 
नो प्रॉब्लमनंतर सुष्मिताने आपली धाकटी मुलगी अलीसाला दत्तक घेतल्यानंतर चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. ती एका मुलाखतीत म्हणाली होती की, तिला आपल्या मुलींच्या संगोपनासाठी वेळ द्यायचा आहे. तसेच मुलींच्या बालपणातील क्षण तिला मिस करायचे नाहीत. अलीसापूर्वी तिने रेने नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे.