आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाऊथचा सुपरस्टार अजित कुमार स्टारर 'वलीमाई' हा चित्रपट गुरुवारी (24 फेब्रुवारी) जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या अॅक्शन-ड्रामा चित्रपटाला चाहत्यांचा आणि समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. वृत्तानुसार, दक्षिणेतील अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा पहिला शो आज पहाटे 4 वाजतापासून सुरू झाला, जवळपास सर्व चित्रपटगृहातील सर्व शोज हाऊसफूल आहेत. पहिल्याच दिवशी हा चित्रपट विक्रमी कमाई करेल, असा विश्वास व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
थिएटरमध्ये सेलिब्रेशन करत आहेत चाहते
सिनेमा हॉलच्या बाहेरील अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये चाहते सेलिब्रेट करताना दिसत आहे. चाहते या चित्रपटाला भारतीय 'फास्ट अँड फ्युरियस' म्हणत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
बोनी कपूर यांच्या गाडीला दूध आणि दह्याने अंघोळ घालण्यात आली
या चित्रपटाबद्दल आणि अजित कुमारबद्दल चाहत्यांची क्रेझ इतकी आहे की दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये सिनेमा हॉलबाहेर रस्ते जाम झाले आहेत. त्यामुळे अनेक मार्ग वळवावे लागले आहेत. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहते चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या निमित्ताने चेन्नईतील FDFS थिएटरमध्ये निर्माते बोनी कपूर यांच्या कारला दूध आणि दह्याने अंघोळ घालताना वदिसत आहेत.
चाहत्यांनी अजितच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घातला
अनेक व्हिडिओंमध्ये चाहते अजित कुमारच्या मोठ्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालताना दिसत आहेत. हुमा कुरेशीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये ती थिएटरबाहेर चाहत्यांची गर्दी पाहून आश्चर्यचकित आणि आनंदी दिसत आहे. वृत्तानुसार, कोईम्बतूरमधील अर्चना थिएटरमध्ये अज्ञात व्यक्तीने अजित कुमार यांच्या चाहत्यांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
रिलीजपूर्वीच या चित्रपटाने विक्रमी 155 कोटींची कमाई केली
रिपोर्ट्सनुसार, अजित कुमारच्या 'वलीमाई' या चित्रपटाचे थिएटर हक्क जागतिक स्तरावर एकूण 96 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाने रिलीजपूर्वीच जागतिक स्तरावर 96 कोटींचा व्यवसाय केला आहे. या आकडेवारीसह, अजित कुमारच्या 'वलीमाई'ने त्याच्या 2017 मध्ये आलेल्या 'विवेगम' चित्रपटाचा विक्रम मोडला, त्याचे 85 कोटी रुपयांना थिएटरचे हक्क विकले गेले होते.
वृत्तानुसार, अजित कुमारच्या वलिमाई या चित्रपटाने थिएटरच्या हक्कांव्यतिरिक्त सॅटेलाइट, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि संगीताद्वारे सुमारे 60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या अर्थाने अजित कुमारच्या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 155 कोटींचा व्यवसाय केला आहे.
एच विनोथ दिग्दर्शित, या चित्रपटात अजित कुमार-हुमा कुरेशीसह कार्तिकेय, योगी बाबू, सुमित्रा आणि पुगाज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अजितने या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.