आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput CBI Inquiry Update | Rhea Chakraborty Mumbai Latest News | Central Bureau Of Investigation (CBI) Investigation 6th Day Today Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीचा सहावा दिवस:सुशांतचा रुममेट, कुक आणि वॉचमॅनची चौकशी; रियाला शवागारात जाण्याची परवानगी दिल्याने मुंबई पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटीस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
हे छायाचित्र 14 जून रोजीचे कूपर हॉस्पिटलचे आहे. येथे सुशांतच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाले होते आणि रिया शवागारात गेली होती.
 • ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स ब्युरो लवकरच रियाची चौकशी करु शकते.
 • सीबीआय सलग पाचव्या दिवशी सिद्धार्थ पिठानीची चौकशी करत आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीचा आज सहावा दिवस आहे. सलग पाचव्या दिवशी सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, सहाव्या दिवशी कुक नीरज सिंहची चौकशी सुरु आहे. आज सुशांतच्या घराच्या वॉचमॅनलादेखील चौकशीसाठी बोलावण्यात आले. दोन पोलिसांनाही या प्रकरणी विचारपूस करण्यात आली.

दुसरीकडे या प्रकरणारा नवी कलाटणी मिळाली आहे. महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने कूपर रुग्णालय आणि मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीला शवागारात जाण्याची परवानगी कशी देण्यात आली यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रियाला कोणत्या नियमांतर्गत परवानगी देण्यात आली आहे? असा सवाल आयोगाने रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांना केला आहे.

 • सुशांत प्रकरणात अमली पदार्थांचा अँगल; नार्को पथक करणार रिया चक्रवर्तीची चौकशी

सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीचा आज सहावा दिवस आहे. सुशांतच्या फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीची सलग पाचव्या दिवशी चौकशी केली जात आहे. दुसरीकडे, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार, रिया एका ड्रग्ज डीलरच्या संपर्कात होती असे दिसून येत आहे. ही बाब समोर आल्यानंतर याप्रकरणी अमली पदार्थांच्या अँगलने आता चाैकशी करणार असल्याचे अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाचे (एनसीबी) संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. याप्रकरणी पैशांच्या अफरातफरीची चौकशी करणाऱ्या ईडीने रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअॅप चॅट्स सीबीआय आणि एनसीबी पथकाकडे सुपूर्द केले आहेत. तथापि याप्रकरणी काहीही माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, रियाने आजपर्यंत एकदाही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही, असा दावा रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे.

दरम्यान सध्या रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅटसमोर आले आहेत. यामध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करताना दिसत आहे. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलीट केले होते. यात पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज 8 मार्च 2017 चे आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाचे हे चॅट सीबीआय तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) कडे दिले आहेत. 10 ऑगस्ट रोजी ईडीने रियाचा फोन ताब्यात घेतला होता.

चॅटमध्ये या 3 गोष्टींचा उल्लेख

 • रियाने हार्ड ड्रग एमडीएमबद्दल या चॅटमध्ये बातचीत केली आहे. हे एक पार्टी ड्रग असून ते मुंबईत सहज मिळते.
 • सॅम्युअल मिरांडाने रियाला यावर उत्तर दिले की - हॅलो रिया, स्टफ जवळजवळ संपला आहे.
 • एका चॅटमध्ये जया साहने रियाला सांगितले होते - पाणी, चहा किंवा कॉफीमध्ये 4 थेंब घालून त्याला द्यायचे आहे. मग 40 मिनिटे लागतील.

सुशांतची बहीण म्हणाली - सीबीआयने त्वरित कारवाई करावी

मंगळवारी रियाच्या ड्रग्ज कनेक्शनवर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने ड्रग्ज बाळगणे हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. 'हा एक गुन्हा आहे. सीबीआयने त्वरीत कारवाई केली पाहिजे #RheaDrugsChat', असे ट्विट श्वेताने केले आहे. सोबतच तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

सीबीआयने मंगळवारी सुशांत प्रकरणाशी संबंधित 6 जणांची चौकशी केली होती. यामध्ये सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा कूक नीरज सिंह आणि केशव बचनेर, हाऊसकीपिंग स्टाफ सॅम्युअल मिरांडा, सीए रजत मेवाती आणि संदीप श्रीधर यांचा समावेश होता. पिठानीची रात्री दीड वाजेपर्यंत चौकशी सुरु होती. तर श्रीधर यांची 10 तास चौकशी केली गेली. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयच्या गेल्या 5 दिवसांच्या चौकशीत पिठानी हा सर्वात मोठा संशयित आहे.

 • सीबीआय आज रियाला समन्स पाठवू शकते

तपास एजन्सीने सुशांतचे शवविच्छेदन करणा-या 2 डॉक्टरांशीही बातचीत केली आहे. सोबतच आज पोस्टमॉर्टम टीमशी संबंधित आणखी 3 डॉक्टरांची चौकशी केली जाऊ शकते. सीबीआय रिया आणि तिच्या कुटुंबियांनाही आज समन्स पाठवू शकते.

 • संदीप सिंहलाला ईडीने समन्स पाठवले

सुशांतचा कथित मित्र संदीप सिंह याचीही लवकरच चौकशी केली जाईल. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) संदीपला समन्स पाठवेल आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अचानक संदीप प्रकाशझोतात आला आहे आणि त्याला सुशांतच्या घरापासून ते पोस्टमॉर्टम रूमपर्यंत पाहिले गेले.

 • सुशांतच्या घरी होणा-या पार्टीत गांजाचे सेवन केले जायचे

सुशांतच्या घरी दर आठवड्याला होणा-या पार्टीत दारू आणि गांजाचे सेवन सेवन केले जात होते, असे सुशांतच्या स्वयंपाक्याने सीबीआय चौकशीत यापूर्वी सांगितले होते. 10 ऑगस्टला ईडीने रिया आणि तिच्या कुटुंबीयांकडून 4 मोबाइल हँडसेट, दोन आयपॅड आणि एक लॅपटॉप जप्त केला होता. यामधूनच अमली पदार्थांचा सुगावा लागला असल्याचा दावा केला जात आहे. तर सुशांत अमली पदार्थांच्या सिगारेट्स ओढत होता, असे नीरज सिंहने सांगितल्याचे वृत्त होते.