आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राधे'च्या गिरगिटसोबत खास बातचीत:गौतम गुलाटीला कशी मिळाली चित्रपटात गिरगिटची भूमिका, म्हणाला- मी याबद्दल सलमान सरांचा आभारी आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेव्हा एखादा मेगास्टार आपल्या मदतीला येतो, हे आश्चर्यकारक आहेः गौतम

'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटात अभिनेता गौतम गुलाटीने गिरगिट ही भूमिका साकारली असून त्याच्या कामाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र गौतम ते गिरगिटपर्यंतचा त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कारण या चित्रपटातील ही खलनायकाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने आपले मन, शरीर आणि आत्म्याला यासाठी तयार केले.

गौतमला कशी मिळाली गिरगिटची भूमिका?

याबद्दल गौतम म्हणतो, "सलमान सर नसते तर हे शक्य झाले नसते. आम्ही एक दिवस अचानक भेटलो आणि त्याने मला मिठी मारली. आपण एकत्र काम करायला हवे, असे त्यांनी मला म्हटले आणि निगेटिव्ह रोल साकारशील का? असे विचारले. हे ऐकल्यानंतर माझ्या कानांवर माझा विश्वास बसला नाही. दुसर्‍याच दिवशी त्यांच्या टीमने मला बोलावले आणि या भूमिकेसाठी माझी निवड केली. माझे कपडे, लूक, ट्रेनिंग या सर्व गोष्टी लवकरात लवकर सुरू झाल्या आणि हेअर स्टाईल बदलण्यासोबतच शूटिंगलाही सुरुवात झाली," असे गौतमने सांगितले.

जेव्हा एखादा मेगास्टार आपल्या मदतीला येतो हे आश्चर्यकारक आहेः गौतम

गौतम पुढे सांगतो, “जेव्हा एखादा आघाडीचा अभिनेता तुमच्यावर विश्वास दाखवतो आणि तुमच्या मदतीसाठी पुढे येतो, हे अतिशय आश्चर्यकारक आहे. चित्रपटातील काही सीन पाहिल्यानंतर त्यांनी माझी भूमिका वाढवली. हे माझ्यासाठी खूप विशेष होते. मी माझे काम संपवून घरी परत गेलो आणि दहा दिवसानंतर मला पुन्हा शूट करण्यासाठी बोलवले गेले. कारण सरांना वाटले की, मी हे अधिक चांगले करू शकेन. आज ही माझी सर्वात मोठी कामगिरी आहे आणि त्याबद्दल मी सरांचा आभारी आहे," अशा शब्दांत गौतमने सलमानविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...