आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • How Was The Story Of Sher Singh Rana From The Murder Of Phoolandevi To Bringing The Ashes Of Emperor Prithviraj Chauhan, Vidyut Jamwal Will Make 22 Thakurs By Killing Phoolan Devi

शेर सिंह राणाची कहाणी:फुलन देवीला ठार मारुन घेतला होता 22 लोकांच्या हत्येचा बदला; तुरुंगातून पळून अफगाणिस्तानात गेला, पृथ्वीराजांच्या अस्थी भारतात आणल्या

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज आपण शेर सिंहच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया...

बॉलिवूडमध्ये आणखी एक बायोपिक बनत आहे, ज्याचे नाव आहे शेर सिंह राणा. अभिनेता विद्युत जामवाल मोठ्या पडद्यावर शेर सिंहची भूमिका साकारत आहे. शेर सिंह राणा यानेच 25 जुलै 2001 रोजी फुलन देवी यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती. 1981 मध्ये झालेल्या बेहमई हत्याकांडाचा हा बदला होता. फुलनदेवी यांनी गावातील 22 ठाकूरांना एकाच वेळी ठार केले होते. फुलनदेवी यांना जीवे मारल्यानंतर शेर सिंह राणाने हत्येच्या 2 दिवसांनी आत्मसमर्पण केले होते. कथा फक्त एवढीच नाहीये.

खटला चालू होता आणि शेर सिंहला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते, पण 3 वर्षे तुरुंगात राहून तो फरार झाला. आधी बांगलादेश आणि नंतर दुबईमार्गे अफगाणिस्तानला पोहोचली. तेथून सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा अस्थिकलश घेऊन भारतात परतला. नंतर पुन्हा तुरुंगात गेली, जामिनावर सुटली, निवडणूक लढवली, आणि 10 कोटींचा हुंडा नाकारला.

शेर सिंहची कथा ही एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभणारी आहे. ज्यात खूप थ्रिल आणि अ‍ॅक्शनही आहे. शेर सिंहचा जन्म 17 मे 1976 रोजी उत्तराखंडमधील रुडकी येथे झाला. शेर सिंहच्या कुटुंबात त्याचा भाऊ, आई-वडील आणि पत्नी आहे. आज आपण शेर सिंहच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया...

22 राजपूतांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खासदाराची हत्या
मध्य प्रदेशातील बेहमई गावातील ठाकूर समाजातील अनेक लोकांनी फुलन देवी यांच्यावर 3 आठवडे बलात्कार केला होता. याचा बदला घेण्यासाठी फुलन एका लग्नात पोलिसांच्या गणवेशात सामील झाल्या आणि 14 फेब्रुवारी 1981 रोजी 22 लोकांना एका रांगेत उभे करुन त्यांच्यावर गोळ्या घातल्या. हे हत्याकांड बेहमई हत्याकांड म्हणून ओळखले जाते. दरोडेखोर फुलन देवी यांनी नंतर आत्मसमर्पण केले.

तुरुंगातून सुटल्यावर फुलन खासदार झाल्या. येथून शेर सिंहची कहाणी सुरू होते. शेर सिंहने 25 जुलै 2001 रोजी दिल्लीतील सरकारी निवासस्थानासमोर फुलन देवी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेच्या 2 दिवसांनंतर शेर सिंहने डेहराडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या हत्येबाबत शेर सिंहने धक्कादायक खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहमई हत्याकांडात मारल्या गेलेल्या 22 राजपूतांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी राणाने फुलन देवीची हत्या केली होती.

तिहार तुरुंगातून फिल्मी स्टाईलमध्ये पलायन
राणाविरुद्ध खुनाचा खटला सुरू होता, तो 3 वर्षे तिहार तुरुंगात होता. 17 फेब्रुवारी 2004 रोजी राणा तुरुंगातून फरार झाला. यानंतर तो मुरादाबाद येथील एका हॉटेलमध्ये थांबला आणि त्याने नातेवाईकांकडे एक लाख रुपये मागितले. त्यानंतर 2 महिने व्हिसासाठी भारतात भटकल्यानंतर तो बांगलादेशला पोहोचला. तेथे त्याने 16,500 रुपयांना एक सॅटेलाइट फोन विकत घेतला जेणेकरून त्याला ट्रॅक न करता त्याला त्याच्या नातेवाईकांशी सहज बोलता येईल. यादरम्यान शेर सिंह राणाला नातेवाईकांकडून दरमहा 15-20 हजार रुपये मिळत होते. बांगलादेशातून दुबईमार्गे तो अफगाणिस्तानात पोहोचला.

पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी गजनीहून भारतात आणल्या
अफगाणिस्तानात गेल्यावर शेर सिंह राणा गजनीला पोहोचला आणि 11 व्या शतकातील सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी भारतात आणल्या. यादरम्यान शेर सिंहने 40 मिनिटांचा व्हिडिओही बनवला, जो त्याने यूट्यूबवर अपलोड केला. राणाने तेथून अस्थिकलश भारतात कसा आणला हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. याकाळात शेर सिंह जवळपास 2 वर्षे तुरुंगातून फरार होता.

गेस्ट हाऊसमधून पुन्हा अटक
अफगाणिस्तानातून भारतात आल्यानंतर 2006 मध्ये राणाला पुन्हा कोलकाता येथील गेस्ट हाऊसमधून अटक करण्यात आली. यानंतर दिल्ली न्यायालयाने 14 ऑगस्ट 2014 रोजी फुलनदेवीच्या हत्येप्रकरणी राणाला जन्मठेप आणि 1 लाख दंडाची शिक्षा सुनावली होती, मात्र सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा अस्थी धोक्यात घालून भारतात आणल्यानंतर त्यांची वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आणि त्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हत्येचा आरोपी म्हणून त्याच्याकडे न पाहता त्याला एक चांगला माणूस समजला जात होता, तर त्याच्या शौर्याचे हिंदू क्षत्रिय सैन्याने कौतुक केले होते. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने शेरसिंग राणाला अंतरिम जामीन मंजूर केला.

आईच्या मदतीने बांधलेले मंदिर
या संपूर्ण घटनेनंतर शेर सिंह राणाने आपल्या आईच्या मदतीने गाझियाबादच्या पिलखुआ येथे पृथ्वीराज चौहान यांचे मंदिर बांधले, जिथे त्यांचे अस्थिकलश आजही ठेवले आहे.

2012 मध्ये निवडणूक लढवली
शेर सिंह राणाने उच्चवर्णीयांचा एक पक्ष स्थापन केला, ज्याचे नाव राष्ट्रीय जन लोक पक्ष असे ठेवले. शेर सिंहने 2012 ची निवडणूक उत्तर प्रदेशातील जेवारमधून सुरेश राणा यांच्याविरोधात लढवली होती, पण त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

10 कोटींचा हुंडा नाकारला
शेर सिंहने 20 फेब्रुवारी 2018 रोजी मध्य प्रदेशचे माजी आमदार राणा प्रताप सिंह यांची मुलगी प्रतिमा राणासोबत दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नात राणाला हुंडा म्हणून 10 कोटी 31 लाख रुपये दिले जात होते, मात्र राणाने ते घेण्यास नकार देत चांदीचे नाणे घेऊन लग्नाचे विधी पूर्ण केले. यावरुनही शेर सिंह खूप चर्चेत होता.

2015 मध्ये बनले आहे गाणे
2015 मध्ये शेर सिंहवर एक गाणे देखील बनले आहे. हे गाणे पंजाबीमध्ये आहे. हे रॅप गाणे यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहे, जे शेर सिंह नावाच्या चॅनलवर 42 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

लिहिली जेल डायरी
शेर सिंहने जेल डायरी नावाचे पुस्तकही लिहिले आहे, ज्यात त्याच्या तुरुंगातील दिवसांची आणि तिहारमधून पळून जाण्याची कहाणी आहे. फुलन देवी यांच्या हत्येचाही या पुस्तकात उल्लेख आहे.

चित्रपटाचे हक्क शेर सिंहकडून घेतले
या चित्रपटाबाबत आमच्या प्रतिनिधीने या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद भानुशाली यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, "या चित्रपटाची कथा आणि अधिकार दिर्घकाळापासून दिग्दर्शक श्रीनारायण सिंह यांच्याकडे होते. ते आमचे जुने मित्र आहेत. म्हणून जेव्हा मी भानुशाली स्टुडिओ कंपनी सुरू केली तेव्हा आम्ही या विषयावर एकत्र काम करायचं ठरवलं." शेर सिंह सध्या उत्तराखंडमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...