21 दिवस प्रेमाचे / घटस्फोटानंतर पहिल्यांदा हृतिकच्या घरी राहायला पोहोचली सुझान, अभिनेत्याने भावनिक पोस्ट लिहून म्हटले धन्यवाद 

  • लॉकडाऊनच्या काळात सुझान आपल्या दोन्ही मुलांसाठी हृतिकच्या घरी राहायला आली आहे. 

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 01:12:00 PM IST


बॉलिवूड डेस्क. देशभरात सुरु असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेता हृतिक रोशनने बुधवारी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहिली. ज्याद्वारे त्याने आपल्या पुर्वाश्रमीची पत्नी सुझानचे केवळ आभार मानले नाहीत तर तिला धन्यवादही दिले. हृतिकने हे केले कारण सुझान लॉकडाऊनच्या काळात त्याच्या घरी राहायला आली आहे. जेणेकरून तिला त्यांच्या दोन्ही मुलांची (हृहान आणि हृदान) यांची काळजी घेता येईल.


हृतिकने त्याच्या पोस्टमध्ये सुझानचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बेडवर बसून काही काम करताना दिसत आहे. यासह लिहिलेल्या पोस्टच्या माध्यमातून त्याने सांगितले की, या कठीण काळात मुलांना पालकांचे समान प्रेम मिळाले पाहिजे आणि सुझान स्वेच्छेने तिचे घर सोडून येथे आली आहे. यामुळे तो भावनिक झाला आणि त्याने ही पोस्ट लिहिली.

  • हृतिक रोशनने लिहिले- 'आमची मुले ही गोष्ट सांगतील'

“जेव्हा देश लॉकडाऊनमधून जात आहे, तेव्हा पालक म्हणून आपल्या मुलांपासून विभक्त राहण्याचा विचार करणे माझ्यासाठी विचारशक्तीच्या पलीकडील आहे.


अनिश्चितता आणि अनेक महिन्यांचे संभाव्य सामाजिक अंतर, कित्येक आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या शक्यतेत जग कसे एकत्र आले हे पाहून खरोखर आनंद होतो.


अशावेळी जेव्हा संपूर्ण जग मानवतेबद्दल एकत्र येत आहे, तेव्हा मला वाटते की हे कल्पनेपेक्षा जास्त आहे. विशेषत: अशा पालकांसाठी जे आपल्या मुलांचा ताबा आपापसांत शेअर करतात. दुसर्‍या पालकांच्या अधिकाराचे उल्लंघन न करता कशाप्रकारे आपल्या मुलांसोबत एकत्र राहावे, ज्यांचा आपल्या मुलांसोबत राहण्याचा समान हक्क आहे.

हे छायाचित्र प्रिय सुझान (माझी पुर्वाश्रमीची पत्नी) चे आहे, जी काही काळासाठी स्वेच्छेने आपले घर सोडून येथे आली आहे, जेणेकरून आमच्यापैकी एकापासूनही मुले अनिश्चित काळासाठी दूर राहू नये.
सह-पालकांच्या आमच्या प्रवासामध्ये सुझानचे खूप समर्थन आणि परस्पर समन्वयाबद्दल धन्यवाद. आमची मुलं ही कहाणी सांगतील, जी आपण त्यांच्यासाठी तयार करत आहोत.


मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, आपण सर्वांनी खुल्या मनाने आपले प्रेम, सहानुभूती, धैर्य आणि सामर्थ्य दर्शविण्याचा आपला मार्ग शोधू. #beopen #bekind #bebrave # जबाबदारी #coexist #empathy #sturngth #courage #oneworld #humanity #wecanfighththis #loveoverfear "

View this post on Instagram

. It is unimaginable for me, as a parent, to think of having to be separated from my children at a time when the country is practicing lockdowns. . It is heartwarming to see the world come together as one in this time of deep uncertainty and possibility of months of social distancing and potential lockdowns for several weeks perhaps . . While the world talks about humanity coming together, I think it represents more than just an idea especially for parents sharing custody of their kids. How to keep their kids close to them without infringing on the right of the other who also has an equal right to be with his/her children. . This is a picture of dear Sussanne (my ex wife) , who has graciously volunteered to temporarily move out of her home so that our children are not disconnected indefinitely from either one of us. . Thank you Sussanne for being so supportive and understanding in our journey of co-parenting. . Our children will tell the story we create for them. . I hope and pray that in order to safeguard the health of ourselves and our loved ones, we all find our way to express love, empathy, courage, strength with an open heart ❤️. . #beopen #bekind #bebrave #responsibility #coexist #empathy #strength #courage #oneworld #humanity #wecanfighththis #loveoverfear

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on Mar 25, 2020 at 1:20am PDT

  • लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघेही विभक्त झाले होते


हृतिक आणि सुझानचे 20 डिसेंबर 2000 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर या दोघांना हृहान आणि हृदान ही दोन मुले झाली. पण 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर डिसेंबर 2013 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांची घटस्फोटाची प्रक्रिया नोव्हेंबर 2014 मध्ये पूर्ण झाली होती. घटस्फोटानंतर, दोन्ही मुले आळीपाळीने आई वडिलांकडे राहतात.

X