आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग प्रोजेक्ट 'रामायण':पडद्यावर राम-सीतेच्या भूमिकेत झळकणार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण, चित्रपटाचे बजेट ऐकून व्हाल थक्क

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 डी स्वरूपात बनणा-या या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटी रुपये असणार आहे.

रामायणावर आधारित अनेक कलाकृती यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता पुन्हा एकदा रामायण थ्री डी स्वरुपात प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. निर्माता मधु मंटेना लवकरच आपल्या ड्रीम प्रोजेक्ट 'रामायण'वर काम सुरू करणार आहे. वृत्तानुसार, 3 डी स्वरूपात बनणा-या या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटी रुपये असणार आहे. तर चित्रपटात प्रमुख भूमिकेत हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण ही जोडी झळकणार आहे. मधु मंटेना यांनी रामच्या भूमिकेसाठी हृतिकची तर सीतेच्या भूमिकेसाठी दीपिकाची निवड केली आहे.

नितीश तिवारी करणार दिग्दर्शन
मधु मंटेना यांच्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितीश तिवारी सांभाळणार आहेत. यापूर्वी त्यांनी 'दंगल' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, मधु मंटेना लवकरच अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांचे फँटम फिल्म्स खरेदी करणार आहेत.

'फायटर'मध्ये एकत्र दिसणार आहे हृतिक-दीपिकाची जोडी
दीपिका लवकरच हृतिक रोशनसोबत फायटर या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे दीपिकासोबतचा हृतिकचा हा पहिलाच चित्रपट असले. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून पुढील वर्षी म्हणजे 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. हृतिकने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता.
देशभक्तीवर आधारित असेल 'फायटर'

हृतिकने चित्रपटाचा टीझर शेअर करताना हा चित्रपट भारतीय लष्करातील एका सैनिकावर आधारित असेल, असे सांगितले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यासह हृतिक तिस-यांदा काम करणार आहे. यापूर्वी या जोडीने वॉर आणि बँग बँगमध्ये एकत्र काम केले होते. मार्फ्लिक्स बॅनरच्या या चित्रपटाची ममता-सिद्धार्थ निर्मिती करत आहेत. वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका दोघेही या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहेत.