आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह इज इन द एअर:हृतिक रोशन आणि सबा खान एअरपोर्टवर हातात हात घालून दिसले चालताना, व्हायरल होतोय दोघांचा हा व्हिडिओ

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत

सध्यासोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता हृतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादसोबत विमानतळावर दिसतोय. विशेष म्हणजे यावेळी हे दोघेही हातात हात घालून चालताना दिसले. इतकेच नाही तर सबा यावेळी चक्क लाजताना दिसतेय. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सबा आणि हृतिकचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

गेल्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत
हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची भेट एका ऑनलाइन डेटिंग अॅपवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण नवीन रिपोर्ट्सनुसार दोघांच्या मैत्रीची सुरुवात ट्विटरवरून झाली. रिपोर्टनुसार, दोघेही गेल्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हृतिकने सबाचा गाण्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता, तेव्हापासून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली होती. आता दोघेही एकमेकांच्या पोस्टवर प्रेमळ कमेंट करताना दिसतात. विशेष म्हणजे सबा आणि हृतिकची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान यांचेही चांगले बाँडिंग आहे. अशा प्रकारे या दोघांच्या भेटीगाठीमुळे त्यांच्या लग्नाच्या अफवांना वेग आला आहे.

तर काही दिवसांपूर्वी हृतिक-सबाच्या एका जवळच्या मित्राने सांगितले होते की, "दोघेही एकमेकांना पसंत करतात. हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडली आहे. हृतिकप्रमाणेच त्याच्या कुटुंबालाही सबाचे संगीत काम आवडते. काही दिवसांपूर्वी सबा आझाद जेव्हा हृतिकच्या घरी गेली तेव्हा सबाने तिने सगळ्यांसाठी गाणी गायली होती. हृतिक आणि त्याच्या कुटुंबाने तिचे गाणे खूप एन्जॉय केले होते. हृतिक आणि सबा एकत्र आहेत, पण त्यांना त्यांचे नाते पुढे नेण्यासाठी घाई करायची नाही." याचा अर्थ दोघांना अजून लग्नाची घाई नाही. पण, दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्ताला त्यांच्या जवळच्या मित्राने दुजोरा दिला आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या मुलासोबत लिव्ह इनमध्ये होती सबा

हृतिकपूर्वी सबाचे नाव अभिनेता इमाद शाहसोबत जोडले गेले. इमाद हा नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा आहे. त्याच्यासोबत सबा काही वर्षांपूर्वी लिव्ह-इनमध्ये होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपट आणि गाण्यांव्यतिरिक्त सबाकडे अनेक कमर्शिअल जाहिराती आहेत. कॅडबरी, पाँड्स, मॅगी, टाटा स्काय, गुगल, किट-कॅट, व्होडाफोन, सनसिल्क, नेस्कॅफे, एअरटेलच्या जाहिरातींमध्ये सबा दिसली आहे.

हृतिक-सबाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर हृतिक रोशन लवकरच 'विक्रम वेधा' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, सबा आझाद शेवटची 'रॉकेट बॉईज' या वेब सीरिजमध्ये झळकली होती. या शोमध्ये तिने परवाना इराणीची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये तिच्यासह जिम सर्भ आणि इश्वाक सिंग हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...