आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे रिटर्न गिफ्ट:हृतिक रोशनने केली आगामी चित्रपट घोषणा, 'फायटर'मध्ये दीपिका पदुकोणसोबत शेअर करणार सिल्व्हर स्क्रिन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील वर्षी म्हणजे 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अभिनेता हृतिक रोशनने नुकताच आपला 47 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसाच्या निमित्ताने हृतिने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव फायटर असून यात तो दीपिका पदुकोण सिल्व्हर स्क्रिन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे दीपिकासोबतचा हृतिकचा हा पहिलाच चित्रपट असले. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून पुढील वर्षी म्हणजे 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. हृतिकने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चित्रपट देशभक्तीवर आधारित असेल
हृतिकने चित्रपटाचा टीझर शेअर करताना हा चित्रपट भारतीय लष्करातील एका सैनिकावर आधारित असेल, असे सांगितले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यासह हृतिक तिस-यांदा काम करणार आहे. यापूर्वी या जोडीने वॉर आणि बँग बँगमध्ये एकत्र काम केले होते. मार्फ्लिक्स बॅनरच्या या चित्रपटाची ममता-सिद्धार्थ निर्मिती करत आहेत. वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका दोघेही या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहेत.

हृतिकने 47 वा वाढदिवस साजरा केला
10 जानेवारीला हृतिक रोशनने वयाची 47 वर्षे पूर्ण केली. डिसेंबर 2019 मध्ये दीपिका-हृतिक एका पार्टीत एन्जॉय करताना दिसले. त्यावेळी दोघांचा पार्टीतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा चाहत्यांनी दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. इतकेच नाही तर 5 जानेवारी रोजी जेव्हा हृतिकने दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळी दीपिका म्हणाली होती की, येणाऱ्या दिवसांत डबल सेलिब्रेशन होणार आहे. दीपिकाच्या या पोस्टनंतर हे दोघेही लवकरच चित्रपटाची घोषणा करू शकतात असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात होता. आता हृतिकने 'फायटर'ची घोषणा करुन वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...