आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनचा आर्यनला पाठिंबा:हृतिकने सोशल मीडियावर लिहिले - 'माझ्या प्रिय आर्यन, देव फक्त सर्वात कणखर व्यक्तींनाच खेळण्यासाठी सर्वात कठीण चेंडू देतो'

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हृतिकने या पोस्टमध्ये आर्यनला या कठिण काळाचा त्याने कसा सामना करायला हवा, हे सांगितले आहे.

एनसीबीने शनिवारी मुंबई ते गोवा प्रवास करणा-या कार्डिएला क्रूझवर कारवाई करत हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता या यादीत अभिनेता हृतिक रोशनचे नाव जोडले गेले आहे. हृतिकने आर्यनला पाठिंबा देणारी एक पोस्ट त्याच्या फोटोसह सोशल मीडियावर शेअर केली आहे. हृतिकने या पोस्टमध्ये आर्यनला या कठिण काळाचा त्याने कसा सामना करायला हवा, हे सांगितले आहे.

काय म्हणाला हृतिक रोशन?
हृतिकने आर्यनला फोटो शेअर करताना लिहिले, 'माझ्या प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण आयुष्यात काहीच निश्चित नसते. पण देव दयाळू आहे. तो फक्त सर्वात कणखर व्यक्तींनाच खेळण्यासाठी सर्वात कठीण चेंडू देतो. तुला माहित आहे की, जेव्हा तुम्ही निवडले जातात तेव्हा या गोंधळात तुम्हाला तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवताना दबाव जाणवू शकतो. राग, गोंधळ, हताश, निराशा या सर्व गोष्टींमधून तुझ्यातील खरा हिरो सर्वांसमोर येईल. परंतु याचवेळी तुला सजग रहायला हवे कारण याच गोष्टींमुळे तुझ्यातील खरेपणा, तुझ्यातील संवेदना, तुझ्यातील प्रेमळपणा हरवला जाऊ शकतो. ’ असे हृतिकने लिहिले.

चुका होणे, धडपडणे, विजयी होणे, यशस्वी होणे हे सर्व एकच आहे
तो पुढे म्हणाला, 'स्वतःवर रागाव परंतु एका मर्यादेपर्यंतच. कारण चुका होणे, धडपडणे, विजयी होणे, यशस्वी होणे हे सर्व एकच आहे. परंतु हे तुला माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे की या प्रवासात कुणाला सोबत घ्यायचे आणि कुणाला दूर ठेवायचे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की यातूनच तू उत्तम व्यक्ती म्हणून घडणार आहेस. तू जेव्हा लहान होतास तेव्हापासून मी तुला ओळखतो आहे. आज जेव्हा तू मोठा झाला आहेस तेव्हा देखील तुला मी पाहतो आहे.'

या क्षणांमधून तू घडणार आहेस
हृतिकने पुढे लिहिले, परिस्थिती आणि त्यातून आलेल्या अनुभवांचा तू स्वीकार कर. हे तुझ्यासाठी गिफ्ट आहेत. माझ्यावर विश्वास ठेव... या सर्व गोष्टींचा काही काळानंतर जेव्हा तू विचार करशील तेव्हा तु्झ्या लक्षात येईल, की या सगळ्या मागे सुद्धा काही तरी कारण होते. तू नेहमी शांत राहा. परिस्थितीचे निरीक्षण कर. कारण हे क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, या क्षणांमधून तू घडणार आहेस.. आणि स्वतःवर विश्वास ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत..’ हृतिकपूर्वी त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिनेदेखील आर्यनला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली होती.

बातम्या आणखी आहेत...