आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान अभिनेता अर्सलान गोनीला डेट करत असल्याची बातमी आहे. अर्सलान हा अलीकडेच 'बिग बॉस 14' मध्ये दिसलेल्या अली गोनीचा भाऊ असून अलीकडेच त्याने अल्ट बालाजीची 'मैं हीरो बोल रहा हूं' ही वेब सीरिज साइन केली आहे. यात तो एक निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की, 42 वर्षीय सुझान जवळजवळ 6 महिन्यांपासून अर्सलानला ओळख आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट टीव्ही इंडस्ट्रीतील त्यांच्या एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. आता हे एकमेकांच्या जवळ आले आहेत.
बॉडी लँग्वेज सांगते, ते फक्त मित्र नाहीत
पिंकविलाने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने लिहिले की, 'सुझान आणि अर्सलान यांच्या देहबोलीवरून हे दोघे फक्त मित्र नसून त्यांचे नाते पुढच्या टप्प्यावर गेल्याचे दिसून येते. दोघेही बर्याचदा टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या त्यांच्या कॉमन फ्रेंडसह हँगआऊट करताना दिसतात.'
असेही म्हटले जात आहे की, अर्सलानसोबतच्या नात्यामुळे सुझान अलीकडेच टीव्ही निर्माती एकता कपूरच्या गँगसह दिसली होती. अद्याप या प्रकरणात अर्सलान आणि सुझानकडून कोणताही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
लग्नाच्या 13 वर्षानंतर हृतिकपासून विभक्त झाली होती सुझान
हृतिक आणि सुझानचे 20 डिसेंबर 2000 रोजी लग्न झाले होते. या दोघांना हृहान आणि हृदान ही दोन मुले आहेत. 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर डिसेंबर 2013 मध्ये दोघांनी लग्नाचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. हृतिकने सुझानपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा करत निवेदनात म्हटले होते की, "सुझानने माझ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिला आमचे 17 वर्षांचे नाते संपवायचे आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा कठीण काळ आहे." नोव्हेंबर 2014 मध्ये दोघांच्या घटस्फोटास अधिकृत मान्यता मिळाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.