आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा संपला असला तरी त्याची जोरदार चर्चा अद्यापही रंगतेय. या सोहळ्यात अभिनेत्री सबा आझाद तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता हृतिक रोशनसोबत पोहोचली होती. रेड कार्पेटवर दोघे पोहोचताच उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. आता या सेरेमनीचे अनेक इनसाइड फोटो समोर येत आहेत. अशाच समोर आलेल्या एका फोटोत हृतिक चक्क सबाची सँडल सांभाळताना दिसला.
नेमके काय दिसले फोटोत?
फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर NMACC च्या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सबा त्यांच्यासोबत पोज देताना दिसतेय. त्यांच्या मागे हृतिक रोशन एका व्यक्तीशी बोलताना दिसतोय. यावेळी त्याच्या हातात सबाची सँडल दिसतेय. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते हृतिक आणि सबाच्या कपल गोल्सचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे यावेळी सबाने परिधान केलेला गाऊन अमित अग्रवाल यांनीच डिझाइन केला आहे.
उपस्थितांच्या खिळल्या हृतिक आणि सबावर नजरा
हृतिक आणि सबा यांनी गाला पार्टीत आपापल्या आउटफिटनेही उपस्थितांचे लक्ष वेधले. दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. ब्लॅक जॅकेट आणि मॅचिंग पँटमध्ये हृतिक नेहमीप्रमाणे हँडसम दिसला. तर दुसरीकडे सबानेही आपल्या कस्टम मेड साडी गाऊन परिधान केला होता.
अतिशय खास आहे सबाचा आउटफिट...
यावेळी सबाने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. तिने साडी एक वेगळाच ट्विस्ट दिला होता.
सबाचा हा कस्टम मेड आउटफिट डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केला होता.
अमितने गाऊनला साडी अटॅच करत एक यूनिक कॉम्बिनेशनमध्ये सादर केले. सबाने आपल्या या हटके आउटफिटमधून भारतीय परंपरा जपण्याचा प्रयत्न केला.
डिझायनर अमित अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, आम्ही या ड्रेसला कंटेंपरेरी टच दिला आहे. हा ड्रेस दोन प्रकारच्या टेक्सटाइलने तयार झाला आहे. साडी बनारसी ब्रोकेड फॅबरिकपासून बनवण्यात आली आहे, त्यावर गोल्डन धाग्यांनी एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
सबाची फिगर लक्षात घेऊन साडीला गाऊनसोबत जोडण्यात आले आहे. गाऊनच्या टॉप पार्ट म्हणजेच बस्टियरचे प्लीट्स एका वेगळ्या मटेरियलपासून तयार करण्यात आले आहेत.
सबाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती नुकतीच 'रॉकेट बाइज सीझन 2' मध्ये झळकली. सोनी लिव्हवर स्ट्रीम झालेल्या या सिरीजमध्ये तिने वकील परवाना इराणी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिरीजचा पहिला सीझन फेब्रुवारी 2022 मध्ये आला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.