आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विक्रम वेधा':हृतिक रोशनने केली चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, दोन वर्षांच्या गॅपनंतर सेटवर परततानाचा खास व्हिडिओ केला शेअर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हृतिक रोशनने आपल्या टीमसोबत सेटवर स्लो-मोशनमध्ये एक हीरोइक एंट्री घेतली

अभिनेता हृतिक रोशनने दस-याच्या मुहूर्तावर त्याच्या आगामी विक्रम वेधा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तब्बल दोन वर्षांच्या गॅपनंतर हृतिक चित्रपटाच्या सेटवर परतला आहे. चित्रपटाच्या सेटवर हृतिकने खास अंदाजात एंट्री घेतली. त्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हृतिक रोशनने आपल्या टीमसोबत सेटवर स्लो-मोशनमध्ये एक हीरोइक एंट्री घेतली आणि त्याचा व्हिडिओ पोस्ट केला. आपल्या टीमला 'खरे नायक' संबोधत हृतिकने लिहिले, "हीरो दोन वर्षांनंतर सेटवर परतत आहे. आणि मी त्यांच्यासमोर चालतोय.”

‘वॉर’च्या यशानंतर हृतिक मोठ्या पडद्यावर दिसला नव्हता. करोना आणि टाळेबंदीमुळे वर्षभरातचित्रीकरणालाच फाटा मिळाला होता. त्यानंतरच्या काळात हृतिकने आपल्या ब्रँड आणि इतर जाहिरातींसाठी वेळ दिला होता. त्यामुळे चित्रपटांपासून दूर असलेल्या हृतिकने ब-याच काळानंतर नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटात हृतिक कुख्यात गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘विक्रम वेध’ या चित्रपटाबरोबर आणखीही काही चित्रपटांसाठी हृतिक करारबद्ध आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर तो ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय डील राकेश रोशन यांच्या ‘क्रिश 4’ चित्रपटाच्या चित्रीकरणालाही तो यावर्षी सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...