आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक हात मदतीचा:हृतिक रोशनने मुंबई पोलिसांच्या ड्युटी ऑफिसर्ससाठी पाठवले हॅण्ड सॅनिटायझर्स, पोलिसांनी ट्विटर हँडलवर व्यक्त केले आभार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.

देशात सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फ्रंटलाइन वॉरियर्सच्या समस्याही वाढल्या आहेत. पण या काळात बॉलिवूड स्टार्स त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाहीयेत. मुंबई पोलिसांची मदत करणा-यासाठी हृतिक रोशनने त्यांच्या ड्युटी ऑफिसर्सच्या सुरक्षेसाठी हॅण्ड सॅनिटायझर्स पाठवले आहेत.

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे - 'मुंबई पोलिसांच्या ऑन ड्युटी अधिका-यांसाठी हॅण्ड सॅनिटायझर्स पाठविल्याबद्दल हृतिक तुमचे धन्यवाद. आमच्या फ्रंटलाइन वॉरियर्सच्या सुरक्षिततेत आपल्या योगदानाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.'

यापुर्वी, हृतिकने एन 95 आणि एफएफपी 3 मास्क बीएमसीच्या कामगारांसाठी पाठविले होते. एवढेच नाही तर तो गरजूंना अन्न पोचविण्यासही मदत करत आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणा-या बॉलिवूडच्या पापाराझी फोटोग्राफर्सच्या मदतीसाठीही तो पुढे आला होता.  

बातम्या आणखी आहेत...