आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिटनेस:हृतिकने शेअर केला 71 वर्षीय वडील राकेश रोशन यांचा वर्कआऊट व्हिडिओ, म्हणाला - 'हे माझ्यासाठी सर्वात प्रेरणादायक आहे'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राकेश रोशन यांनी गेल्या वर्षी घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली होती.

हृतिक रोशनने त्याचे वडील राकेश रोशन यांचा एक वर्कआऊट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राकेश रोशन भरपूर व्यायाम करताना दिसत आहे. हृतिकने व्हिडिओ शेअर  करुन  कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'एकटे आहेत, पण करत आहेत. हे माझ्यासाठी  इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रेरणादायक आहे, माझा डेली डोज.' 

गेल्या वर्षी कर्करोगाविरूद्धची लढाई जिंकली : राकेश रोशन यांनी गेल्या वर्षी घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली होती. ते 71 वर्षांचे आहेत. 15 डिसेंबर (2018) रोजी राकेश रोशन यांची बायोप्सी चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली होती. 8 जानेवारी रोजी एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 12 जानेवारीला ते परत आले. त्यांचे किमोथेरपी सत्र तीन आठवड्यांनंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात सुरू झाले. आता ते पूर्वीपेक्षा बरेच स्वस्थ आहेत.

आईसुद्धा आहे फिटनेस फ्रीकः हृतिकचे वडीलच नव्हे तर आई पिंकी रोशन देखील फिटनेस फ्रीक आहेत. वयाच्या 65 व्या वर्षीही, पिंकी पर्सनल ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करतात. त्या नेहमी इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या  वर्कआऊट शेड्युलमध्ये वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, योगा यांचा समावेश आहे. हृतिक त्याच्या आईच्या फिटनेस प्रेमामुळेही प्रभावित झाला आहे. एका मुलाखतीत तो आई पिंकी यांच्याबद्दल म्हणाला होता, 'मी तिच्यावर खूप प्रभावित झालो आहे. माझी आई ही स्त्री शक्तीचे एक जिवंत उदाहरण आहे. मला तिच्यात एक मूल आणि एक अनुभवणारी स्त्रीसुद्धा दिसली जी तिच्या अनुभवांवरून दररोज पुढे जात आहे. ती नेहमीच इतरांना प्रेरित करते.'

बातम्या आणखी आहेत...