आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटकाळी मदत:ऋतिक रोशनने एनजीओसोबत मिळून घेतली गरजवंतांना अन्न पोहोचवण्याची जबाबदारी, म्हणाला - 'देशात कुणीही उपाशी झोपू नये'

बॉलिवूड डेस्क3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय पात्र एनजीओने मानले ऋतिकचे आभार

बीएमसी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी N95 आणि FFP3 मास्कची व्यवस्था केल्यानंतर ऋतिक रोशन आता त्या लोकांसाठी 1.2 लाख पौष्टिक शिजवलेल्या भोजनाची व्यवस्था करण्यास मदत करत आहे, ज्यांना यावेळी अन्नाची कमतरता भासत आहे. ऋतिकने अक्षय पात्र नावाच्या एनजीओची मदत केली आहे, जे वृद्धाश्रम, रोजाने काम करणारे मजूर, भारतातील कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गातील लोकांसाठी या काठी प्रसंगी पौष्टिक शिजवलेले भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे.  

अक्षय पात्र एनजीओने मानले ऋतिकचे आभार... 

एनजीओ अक्षय पात्रने ऋतिकची मदत मिळाल्याबद्दल इन्स्टाग्रामवर लिहिले आहे, "आम्हला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आमच्या फाउंडेशनला आता सुपरस्टार @iHrithik ने सशक्त बनवले आहे. मिळून आता आम्ही वृद्धाश्रम, रोजाने काम करणारे मजूर, भारतातील कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गातील लोकांसाठी या काठी प्रसंगी पौष्टिक शिजवलेले भोजन तोपर्यंत उपलब्ध करून देऊ शकू, जोपर्यंत त्यांची दैनंदिन आर्थिक परिस्थिती सामान्य होत नाही. आम्ही ऋतिक रोशनच्या या तातडीच्या मदतीसाठी त्यांचे आभारी आहोत. तुमच्या या भावनेसाठी आम्ही तुमचे मनापासून धन्यवाद करतो @iHrithik"

ऋतिकने आपल्या ट्विटर हँडलवर उत्तर देत लिहिले, "मी तुम्हाला याची शाश्वती देतो की, आपल्या देशात कुणीही उपाशी झोपणार नाही. तुम्ही सर्व खरे सुपरहीरो आहात. #IndiaFightsCorona #CovidRelief”

बातम्या आणखी आहेत...