आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृतिकची हॉलिवूडवारी:अभिनेता हृतिक रोशन लवकरच हॉलिवूडमध्ये, बिग बजेटच्या स्पाय थ्रिलर चित्रपटात झळकू शकतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हृतिकच्या आधी अनेक भारतीय कलाकारांनी हॉलिवूडमध्ये नशीब आजमावले आहे.

20 वर्षांपूर्वी 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारा हृतिक रोशन आता हॉलिवूडची वाट पकडणार आहे. सर्व काही जुळून आल्यास तो एका स्पाय थ्रिलर चित्रपटात दिसू शकेल. रिपोर्ट्सनुसार हृतिकने या चित्रपटासाठी ऑडिशनही दिले आहे.

चर्चा आहे की, एक बहुचर्चित प्रॉडक्शन हाऊस या मल्टी-मिलियन प्रोजेक्टवर पैसे गुंतवत आहे. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाची निर्मिती करणा-या प्रोडक्शन हाऊसने हृतिकच्या टीमला चित्रपटातील भूमिकेची आणि सीनची माहिती देऊन हृतिकला ते रेकॉर्ड करून पाठविण्यास सांगितले होते. हृतिकने दोन आठवड्यांपूर्वी ऑडिशन पाठवले होते.

हृतिक आणि प्रोडक्शन हाऊसमधील चर्चासुद्धा सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर हृतिक 'क्रिष 4' च्या शूटिंगनंतर या चित्रपटात सामील होऊ शकेल. तथापि, हृतिकने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

'वॉर'मध्ये दिसला होता हृतिक
हृतिकने गेल्या वर्षी हॉलिवूडमध्ये हात करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने अमेरिकन एजन्सी गेर्शसोबत हात मिळवणी केली होती. ही एजन्सी कलाकारांना हॉलिवूडमध्ये प्रोजेक्ट मिळवू देण्यास मदत करते. हृतिकच्या आधीच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर तो 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर' या चित्रपटात दिसला होता. ज्यात त्याने जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिले होते. या चित्रपटात त्याच्या अपोझिट वाणी कपूर होती. यापूर्वी तो 'सुपर 30' मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने गणितज्ञ आनंद कुमारची भूमिका साकारली होती.

हृतिकच्या आधी अनेक भारतीय कलाकारांनी हॉलिवूडमध्ये नशीब आजमावले आहे. प्रियांका चोप्रा ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिने हॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तर दीपिका पदुकोणदेखील 2017 मध्ये XXX: द रिटर्न ऑफ़ जेंडर केजमध्ये झळकली आहे.