आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृतिक-कंगना E-mail वाद:जबाब नोंदवण्यासाठी क्राइम ब्रांचच्या ऑफिसमध्ये पोहोचला हृतिक रोशन, 2016 मध्ये कंगनाविरोधात दाखल केली होती FIR

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हृतिक काही वेळापूर्वीच क्रॉफर्ड मार्केटस्थित क्राइम ब्रांचच्या ऑफिसमध्ये दाखल झाला आहे.

अभिनेता हृतिक रोशनला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स पाठवले होते. मुंबई पोलिसांनी त्याला आज (27 फेब्रुवारी) आपला जबाब नोंदवण्यासाठी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकासमोर (CIU) हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार हृतिक काही वेळापूर्वीच क्रॉफर्ड मार्केटस्थित क्राइम ब्रांचच्या ऑफिसमध्ये दाखल झाला आहे. हे प्रकरण पाच वर्षे जुने असून डिसेंबर 2020 मध्ये सायबर सेलकडून CIU कडे वर्ग करण्यात आले होते.

हे होते संपूर्ण प्रकरण
हृतिक रोशन याला 2013 ते 2014 दरम्यान जवळपास 100 ईमेल मिळाले होते. यावेळी त्याने स्पष्ट केले होते की, ते सर्व ईमेल कंगनाच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. याच प्रकरणात हृतिकने 2016 साली मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हे ईमेल बोगस आयडीवरून पाठवल्याचा कंगनाने दावा केला होता.

कंगनाने तिचा ईमेल हॅक झाला असून तिने हृतिकला कधीही ईमेल पाठवले नसल्याचे सांगितले होते. हृतिकच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात IPC r/w 66 C आणि Dच्या कलम 419 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला होता. काही दिवसांपूर्वी हृतिकचे वकील महेश जेठमलानी यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास पुढे न्यावा, अशी विनंती केली होती.

बॉलिवूडचे सर्वात गाजलेले भांडण

हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात क्रिश सिनेमाच्या दरम्यान प्रेमसंबंध जुळले होते. मात्र पुढे या दोघांचे अफेयर आणि ब्रेकअप दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या. या दोघांनी एकमेकांवर बरीच चिखलफेकही केली होती. 2016 पासून सुरू असलेल्या या प्रकरणात हृतिक आणि कंगना यांनी एकमेकांविरोधात बऱ्याच तक्रारी दाखल केल्या. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप घडले. एका मुलाखतीत कंगनाने हृतिकचा उल्लेख सिल्ली एक्स म्हणून केला होता, त्यानंतर हृतिकने कंगनाला नोटीस पाठवली होती. यानंतर हृतिक आणि कंगना रिलेशनशिपमध्ये होते, असे समोर आले होते. या दोघांनी दोन चित्रपटांत एकत्र काम केले होते. 2010 मध्ये आलेल्या 'काइट्स' आणि 2013 च्या 'क्रिश 3'मध्ये हृतिक आणि कंगना एकत्र झळकले होते.

जावेद अख्तर यांनी माफी मागण्यासाठी दबाव आणला होता?
जावेद अख्तर यांनी आपल्याला घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली होती, असा दावा कंगनाने केला होता. याशिवाय कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल हिनेदेखील जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाची पोस्ट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...