आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विक्रम वेधा’वर अपडेट:हिंदी रिमेकमध्ये चार वेगळ्या भूमिकेत दिसणार हृतिक, मुंबई, लखनऊ, काशी आणि यूपीत होणार चित्रपटाचे चित्रीकरण

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काशीवर आधारित असेल वेधाचे नकारात्मक पात्र, स्टायलिश लुंगी घालणार अभिनेते

तीन वर्षाच्या चर्चेनंतर अखेर ‘विक्रम वेधा’ सिनेमावर काम सुरू झाले आहे. याच्या हिंदी रिमेकची शूटिंग याच वर्षी जूनमध्ये सुरू होणार आहे. त्याची जोरदार सुरू आहे. चित्रपटात वेधाच्या रूपात दिसणारा हृतिक रोशन चार वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची पात्रं काशीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यासाठी हृतिकने आपला गेटअप आणि कॉस्ट्यूमविषयी काही खास माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर हृतिकने आपल्या पात्रासाठी खास थेट काशीची मूळ भाषा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्याला तेथील भाषा तेथील टोनमध्ये शिकवण्यासाठी एक प्रशिक्षकही नेमण्यात आला आहे.

'धूम 2’ नंतर दुसऱ्यांदा दिसणार नकारात्मक भूमिकेत
चित्रपटात हृतिकच्या लूकवर बरेच प्रयोग केले जात आहेत. त्याचे वेधाचे पात्र तरुण वयापासून ते गुन्हेगारी जगतात अधिपत्य गाजवण्यापर्यंतचे वेगवेगळ्या रूपात दाखवले जाणार आहे. हृतिक स्वत:ही चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. कारण 'धूम 2’ नंतर तो पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाचे 60 टक्के शूटिंग लखनऊ, बनारस आणि यूपीत होणार
सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रम वेधाचे 40 टक्के चित्रीकरण मुंबईत होणार आहे. तर उर्वरित 60 टक्के चित्रीकरण हे लखनऊ, बनारस आणि यूपीत होईल. कोविडची दुसरी लाट आली नसती तर एप्रिल महिन्यातच हा चित्रपट फ्लोअरवर आला असता. निर्माते याचे चित्रीकरण काही लाइव्ह लोकेशनवर घेऊ इच्छित आहेत. यासाठी त्यांनी मुंबई आणि काशीमध्ये काही ठिकाणाची पाहणी केली आहे. टीम आधी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणाचे शेड्यूल पूर्ण करेल. दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनी आपल्या टीमकडून हृतिक रोशनच्या पोशाखाची ट्रायलदेखील घेतली आहे. चित्रपटात हृतिकला फिट दाखवले जावे का फॅट यावर निर्माते अजून विचार करत आहेत.

मी नकारात्मक पात्रांमधून व्यक्तिमत्त्व शोधू शकतो : सैफ
या चित्रपटात सैफ अली खान पोलिस विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याची भूमिका सकारात्मक आहे पण प्रभाससोबत असलेल्या ‘आदिपुरुष’ मध्ये तो नकारात्मक भूमिका साकारत आहे. या सिनेमात आपल्या लंकेशच्या भूमिकेविषयी तो म्हणाला, 'आपण तात्पुरता विचार करूया, खरचं माणसाची 10 डोकी असतील तर त्याचा मेंदू खरोखरच किती वेगवान असेल. पडद्यावर त्या गोष्टी साकारणे हा स्वत: चा एक उत्तम अनुभव असेल. “तान्हाजी” आणि “लाल कप्तान” या कालखंडातील चित्रपटांमध्ये मी माझ्या अभिनयात बरेच बदल आणि प्रयोग केले. या व्यक्तिरेखांमधून मी माझे व्यक्तिमत्त्व शोधू शकलो.'

बातम्या आणखी आहेत...