आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपरहीरो फ्रेंचाइजी:'कृष 4'वर एक वर्ष प्री-प्रॉडक्शनचे काम करणार हृतिक, व्हीएफएक्सचा वापर करून पिता-पुत्र करत आहेत चित्रपटाची तयारी

अमित कर्ण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जानेवारी 2022 मध्ये सुरू होऊ शकते चित्रीकरण

अभिनेता हृतिक रोशनने आपल्या वाढदिवशी ‘फायटर’ची घोषणा केली. याचे शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरू होणार आहे. याशिवाय त्याच्या "कृष 4' या चित्रपटा विषयीदेखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याचे प्री-प्रॉडक्शनचे काम वर्षभर सुरू राहणार आहे. याचे शूटिंग 2022च्या सुरुवातीला करण्याची तयारी आहे. तारीख अजून ठरलेली नाही. तारीख मागे पुढेही होऊ शकते. याची माहिती लेखक रॉबिन भट्टन यांनी दिली.

रोहित मेहरा वेगळ्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दिव्य मराठीसोबत बोलताना रॉबिन म्हणाले, "चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. याविषयी नुकतीच राकेश रोशन यांच्यासोबत बैठक झाली. यात हृतिकची ट्रिपल भूमिका आहे का? याविषयी अजून स्पष्ट सांगता येणार नाही. मात्र रोहित मेहराच्या पात्रात हृतिक वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येईल, एवढे मात्र नक्की आहे. शूटिंगविषयी बोलायचे झाले तर त्यात अजून बराच वेळ आहे. कारण चित्रपटात बरेच स्पेशल इफेक्ट्स आहेत. त्यामुळे याचे प्री प्रॉडक्शन दीर्घकाळ चालणार आहे. एकूणच चित्रपट 2022 मध्ये तयार होणार आहे. शिवाय हृतिक ‘क्रिष 4’च्या आधी 'फायटर' आणि 'नाइट मॅनेजर'चे शूटिंग पूर्ण करणार आहे.

हृतिकजवळ आहेत मेगा प्रोजेक्ट्स
'कृष 4'पूर्वी हृतिक 'फायटर' आणि 'नाइट मॅनेजर'चे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. 'फायटर' या चित्रपटात हृतिक दीपिका पदुकोण सिल्व्हर स्क्रिन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे दीपिकासोबतचा हृतिकचा हा पहिलाच चित्रपट असले. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून पुढील वर्षी म्हणजे 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. हृतिकने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हृतिकने चित्रपटाचा टीझर शेअर करताना हा चित्रपट भारतीय लष्करातील एका सैनिकावर आधारित असेल, असे सांगितले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यासह हृतिक तिस-यांदा काम करणार आहे. यापूर्वी या जोडीने वॉर आणि बँग बँगमध्ये एकत्र काम केले होते. मार्फ्लिक्स बॅनरच्या या चित्रपटाची ममता-सिद्धार्थ निर्मिती करत आहेत. वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका दोघेही या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहेत.

नाइट मॅनेजरच्या चित्रीकरणासाठीही हृतिकला वेळ लागणार आहे. मूळ सीरिज इजिप्त बेस्ड आहे. दिल्ली, गोवा, मुंबई, केरळ, काश्मिरमध्ये या चित्रपटाचे तो चित्रीकरण करणार आहे.

मीडिया रिपोर्ट्नुसार, 'कृष 4'मध्ये हृतिक हीरो आणि व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांना पडद्यावर हृतिक v/s हृतिक बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...