आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्मिना रोशनचा 27वा वाढदिवस:सबाने हृतिकच्या चुलत बहिणीला दिल्या शुभेच्छा, फोटो शेअर करत म्हणाली – तूच खरा हिरा आहेस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनने काल तिचा 27 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद हिने तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पश्मिनाचा फोटो शेअर करत तिने पश्‍मीनाचा खरा हिरा असा उल्लेख केला. आणखी एका पोस्टमध्ये सबाने तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

सबाने लिहिली एक प्रेमळ पोस्ट
सबाने पश्मिनाचा फोटो शेअर करत लिहिले, 'पश्मिना, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी पश (पश्मिना) या जगात तू खरा रत्न आहेस!! तू जशी आहेस तशीच राहा!!' सबाने पश्मिनाचा आणखी एक फोटो शेअर करत लिहिले, 'उफ खूपच सुंदर. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझी क्यूट पश्मिना रोशन.'

पश्मिनाच्या बर्थडे पार्टीत सबा, हृतिक गैरहजर काल रात्री पश्मिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे संपूर्ण कुटुंब जेवायला आले होते. या डिनर पार्टीत सबासुद्धा सहभागी झाली होती. या पार्टीत हृतिक गैरहजर दिसला. हृतिकची गर्लफ्रेंड सबा आणि पश्मिना या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. हृतिक रोशनचे वडील राकेश रोशनही या पार्टीत सहभागी झाले होते.

पाहूया या पार्टीचे काही खास फोटो-

काल रात्री पश्मिनाच्या बर्थडे डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साबादेखील सहभागी झाली होती.
काल रात्री पश्मिनाच्या बर्थडे डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साबादेखील सहभागी झाली होती.
पार्टीत पश्मिना शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोहोचली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
पार्टीत पश्मिना शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोहोचली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
या पार्टीत हृतिक रोशनचे वडील राकेश रोशनही स्पॉट झाले होते.
या पार्टीत हृतिक रोशनचे वडील राकेश रोशनही स्पॉट झाले होते.

कोण आहे पश्मिना रोशन?

पश्मिना रोशन ही दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी आणि अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. पश्मिना सध्या हिंदी चित्रपटांतून करिअर सुरू करण्याच्या तयारीत आहे. ती लवकरच 'इश्क विश्क'चा सिक्वेल 'इश्क विश्क रिबाउंड'मध्ये दिसणार आहे. पश्मिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कार्तिक आर्यन देखील तिच्या फॉलोअर्सपैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...