आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:हृतिक रोशनची आजी पद्मा राणी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले, ब-याच काळापासून होत्या आजारी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतीच्या निधनानंतर पद्मा रोशन कुटुंबासोबत राहत होत्या

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आजी पद्मा राणी ओम प्रकाश यांचे 16 जून रोजी निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. पद्मा बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. काल दुपारी तीनच्या सुमारास त्यांची झोपेतच प्राणज्योत मालवली. मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रसिद्ध निर्माते जे ओम प्रकाश यांच्या पत्नी होत्या पद्मा
पद्मा या प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक दिवंगत जे ओम प्रकाश यांच्या पत्नी होत्या. जे ओम प्रकाश यांनी 'आप की कसम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये 'अपना बना लो', 'अपनापन', 'आशा', 'अर्पण', 'आदमी खिलौना है' यांसारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. 7 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

पतीच्या निधनानंतर पद्मा रोशन कुटुंबासोबत राहत होत्या
जे ओम प्रकाश यांच्या निधनानंतर पद्मा त्यांची मुलगी पिंकी रोशन आणि त्यांच्या कुटुंबासोबत राहात होत्या. हृतिक रोशनची आई पिंकी अनेकदा आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असत. तर हृतिकदेखील त्याच्या आजी-आजोबांच्या खूप जवळ होता. राकेश रोशन हे पद्मा यांचे जावई आहेत.

हृतिकचे आगामी प्रोजेक्ट्स

हृतिक लवकरच 'विक्रम वेधा' या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हृतिकचा चित्रपटातील वेधाचा फर्स्ट लूक त्याच्या वाढदिवशी लाँच करण्यात आला. या चित्रपटात सैफ अली खान, राधिका आपटे आणि रोहित सर्फ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'फाइटर' आणि 'क्रिश 4' सारखे चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...