आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात:हृतिक रोशनची आई पिंकी यांना कोरोनाची लागण, 67 व्या वाढदिवशी समोर आली बातमी; 15 दिवसांपासून खंडाळ्यात आहेत क्वारंटाइन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी पिंकी रोशन यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली.

अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या 67 व्या वाढदिवशी म्हणजे गुरुवारी ही बातमी समोर आली. त्यांना लक्षणे असिम्प्टमॅटिक आहेत. सध्या त्या पती राकेश रोशन यांच्यासोबत खंडाळ्यात आहेत. जिथे त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कर्मचा-यांची दर 20 दिवसाला कोरोनाची चाचणी केली जाते. त्यांचा मागील कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला.

  • शुक्रवारी आणखी एक टेस्ट होईल

गुरुवारी पिंकी रोशन यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने त्यांच्या मुलांनी त्यांना खोलीच्या बाहेर सरप्राईझ गिफ्ट दिले. ज्याचा सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांनी उल्लेख केला आहे. शुक्रवारी पिंकी यांची आणखी एक चाचणी होईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, अशी त्यांना आशा आहे. या आयसोलेशनच्या काळात पिंकी यांच्यासह त्यांच्या आई, मुलगी सुनयना आणि नात सुनारिका या खंडाळ्यातील त्यांच्या घरी आहेत.

  • सुशांत सिंह राजपूतबद्दल लिहिली पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या चार महिन्यांनी पिंकी रोशन यांनी इन्स्टाग्रामवर सुशांतच्या फोटोसोबत एक पोस्ट लिहिली आहे. ‘प्रत्येकाला सत्य हवंय पण कुणालाही प्रामाणिक राहायचे नाहीये’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. सोबतच सुशांतचा फोटोसुद्धा त्यांनी पोस्ट केला. #prayersarepowerful #universeispowerful असे हॅशटॅगसुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये वापरले.