आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनचे ओटीटी पदार्पण लांबणीवर:चार प्रोजेक्ट्स आणि दीर्घ शेड्युलमध्ये होऊ शकले नाही डिजिटल पदार्पण; हृतिकने सोडले 92 कोटींवर पाणी, सायनिंग अमाउंट केली परत

अमित कर्ण7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटासाठी डिजिटल पदार्पण सोडले

काेरोना काळानंतर मोठे कलाकार एका पाठोपाठ एक ओटीटीवर पदार्पण करत आहेत. पुढच्या महिन्यात हृतिक रोशनदेखील हॉस्टस्टारवर डिजिटल पदार्पण करणार होता. मात्र त्याने आपले चार प्रकल्प आणि दीर्घ शेड्यूलमुळे शेवटच्या क्षणी त्या प्रकल्पातून हात मागे घेतले. ट्रेड सूत्रानुसार, निर्माते त्याच्याकडून 70 दिवसांची मागणी करत होते. त्यावर हृतिकनेदेखील आपल्या तारखा मॅनेज करण्याचा खूपच प्रयत्न केला मात्र ‘विक्रम वेधा’, ‘फायटर’, ‘रामायण’, आणि ‘कृष 4’ सारख्या प्रकल्पामुळे तो हॉटस्टारच्या वेब सिरीजला हिरवा कंदील दाखवू शकला नाही.

हृतिकचे डॉनचे पात्र लुंगीमध्ये
अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’वरदेखील याच वर्षी जूनमध्ये काम सुरू होणार होते. मात्र आता तो दुबईत पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. यात हृतिक उत्तर प्रदेशच्या डॉनच्या भूमिकेत आहे. हृतिकचे पात्र मुंबईला येऊन तेथील गँग संपवून पूर्ण मुंबईवर राज्य करू पाहत असतो. तो यात उत्तरप्रदेश-बिहारमध्ये घातली जाणारी लुंगीमध्ये दिसणार आहे. असो, या वर्षी एप्रिलमध्ये दुसरे लॉकडाऊन लागल्यानंतर ‘विक्रम वेधा’ चार महिने पुढे ढकलण्यात आला आहे. यासाठी लखनऊ आणि त्याच्या जवळपासच्या भागात पाहणी करण्यात आली होती. त्यामुळे हृतिकचा ‘फायटर’ आणि ‘रामायण’चे शेड्यूलदेखील प्रभावित झाले होते.

चित्रपटासाठी डिजिटल पदार्पण सोडले

‘विक्रम वेधा’, ‘फायटर’, ‘रामायण’ आणि ‘कृष 4’ या चित्रपटांना आधीच उशीर झाला आहे, ते ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले नाहीत. ‘कृष 4’वर जानेवारी 2021 मध्ये काम सुरू होईल. मात्र त्यावर अजून बरेच काम उरले आहे. दुसरीकडे ‘रामायणा’ची हीच परिस्थिती आहे. मधु मंटेना आणि नितेश तिवारी दोन वर्षापासून प्रकल्प सुरू करण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे हृतिकवर हा चित्रपटदेखील लवकर सुरू करण्याचे प्रेशर होते. सर्व प्रकल्पांना उशीर होऊ नये म्हणून हृतिकने आपले डिजिटल पर्दापण कुर्बान केले.

निर्मात्यांना परत केले पैसे
हृतिक त्याचे डिजिटल पर्दापण बीबीसी प्रॉडक्शन्सची सिरीज ‘द नाइट मॅनेजर’च्या हिंदी आवृत्तीतून करणार होता. यासाठी 90 कोटींचा करार झाला होता. यात काम करत नसल्यामुळे हृतिकने प्रॉडक्शन हाऊसला सायनिंग अमाउंट परत केले. आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर बोर्डावर आले आहेत. निर्मिती बीबीसीच्या व्यतिरिक्त बनिजय आशिया, सलमान खान फिल्म्स मिळून करणार आहेत.

या कलाकारांनीदेखील बुक केल्या तारखा

ट्रेड विश्लेष्कांच्या मते, ‘वेब सिरीजसाठी जास्तीच्या तारखा बुक कराव्या लागतात. सध्या इतर कलाकारांनीदेखील तारखा बुक केल्या आहेत.

  • अदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर- ‘द नाइट मॅनेजर’साठी दोन्ही कलाकारंानी 60 ते 70 दिवसांच्या तारखा दिल्या आहेत.
  • अजय देवगण : वेब सिरीज ‘रूद्रा’साठी 48 दिवसांपासून शूटिंग करत आहे. पुढे दिवाळीच्या काळातही त्याला 12 दिवस आणखी द्यावे लागणार आहेत.
  • अक्षय कुमार: ‘द अँड’ साठी अभिनेता 55 ते 64 दिवसांच्या तारखा पुढच्या वर्षी देणार आहे.
  • शाहिद कपूर: राज अँड डीकेच्या वेब सिरीजसाठी 80 ते 90 दिवसांच्या तारखा दिल्या.
बातम्या आणखी आहेत...