आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन प्रयोग:हुमा कुरेशी स्वत:साठी बनली हेअरड्रेसर, व्हिडिओ शेअर करुन विचारले  - कुणाला केस कापायचे आहेत का?

  मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हुमा कुरेशीने स्वत: चा केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री हुमा कुरेशीला स्वत:साठीच हेअरड्रेसर व्हावे लागले. बुधवारी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्वतःचे केस कापताना दिसत आहे. या व्हिडिओसह तिने हेअरकटनंतरचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची नवीन हेअरकटही दिसली. जी बर्‍यापैकी 'साधना कट'सारखी दिसते.

शेअर केलेल्या फोटोत हुमा आपल्या हातात कापलेले केस घेऊन दिसली. ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, 'सध्या मी केशभूषा उर्फ ​​हेअरड्रेसर बनण्याचे प्रशिक्षण घेत आहे. कुणाला केस कापायचे आहेत का ??? #fringebangs #haircut #quarantine #quarantinelife #socialdistancing #lockdown'

अनेक सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया

हुमा कुरेशीच्या पोस्टवर कमेंट करताना अभिनेत्री अनुष्का रंजनने मिश्किलपणे लिहिले की, 'मलाही ट्रिम पाहिजे आहे.' तिला उत्तर देताना हुमाने लिहिले की, 'हा लॉकडाऊन संपताच अनुष्का तू माझी पहिली ग्राहक असशील'. आदिती राव हैदरीनेनी तिच्या पोस्टवर 'हाहाहा' अशी कमेंट दिली.तर रिया चक्रवर्तीने लिहिले, "अविश्वसनीय, तू स्वतःच आपले केस कापते."

बातम्या आणखी आहेत...