आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:हुमा कुरैशीने सांगितले - 'महाराणी’च्या गेटअपमध्ये माझ्या आईनेदेखील मला ओळखले नव्हते,  या लूकमध्ये पाहिले तेव्हा जाेर-जोराने हसू लागली होती

उमेश कुमार उपाध्याय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 28 मे रोजी रिलीज होणार सुभाष कपूर दिग्दर्शित सारिज 'महाराणी’

अभिनेत्री हुमा कुरैशीचा 'आर्मी ऑफ द डेड’ हा हॉलिवूड चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. शिवाय येत्या शुक्रवारी सोनी लिव या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर तिची वेब सीरिज 'महाराणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याव्यतिरिक्त ती तामिळ चित्रपटातही काम करत आहे. भास्करसोबतच्या या खास बातचीतमध्ये तिने आपला अभिनय, तयारी आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.विविध इंडस्ट्रीत काम करताना मजा येत असून एक कलाकार म्हणून स्वतःला ग्रो करत असल्याचे हुमा सांगते.

  • 'महाराणी' मध्ये तुझे कोणते पात्र आहे ? त्यासाठी कशी तयारी केली ?

यात मी राणी भारतीचे पात्र साकारत आहे. ती अशिक्षित आणि बिहारच्या गावात राहणारी महिला असते. ती कधी गावातून बाहेर गेलेली नसते. घरच्या चार भिंतीत राहून स्वयंपाक बनवणे, गायी, म्हशी, बकऱ्यांची देखरेख करणे, हेच तिचे जीवन आहे. अशा महिलेला अचानक राजकारणात आणले जाते तेव्हा ती कशी हँडल करते यावरच ती कथा आहे. या कथेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक मुद्दयांवर लक्ष वेधले आहे. राणी भारतीचा पोशाख, उठणे-बसणे आणि लूक समजण्यासाठी वर्कशॉप केली. एकदा पात्र आत्मसात केले तर काम करण्यास मजा येते.

  • ट्रेलर पाहून लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?

टीझर आणि ट्रेलर पाहून चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही तुम्हाला ओळखलेच नाही, अशा प्रतिक्रिया होत्या. भांगात कंुकू लावून आणि साडी घालून मी जेव्हा स्वत:ला आरशात पाहिले तेव्हा शॉक्ड झाले हाेते. मात्र माझ्यापेक्षा घरचे शॉक्ड होते. माझ्या आईने मला जेव्हा या लूकमध्ये पाहिले, तेव्हा जाेर-जोराने हसू लागली. विचारले कोण आहे ? मी म्हणाले, मी आहे तर म्हणाली ही माझी मुलगी नाही. मी म्हणाले, गावात जन्म झाला असता तर असेच दिसले असते.

  • 'बेलबॉटम’ मध्ये कामाची वेळ पाळणाऱ्या अक्षय कुमारसोबत कामाचा अनुभव कसा राहिला ?

अक्षयसोबत काम करण्याची खूप मजा आली. त्यांच्या मुळेच आम्ही पाच-सहा वाजेपर्यंत शूटिंग संपवत होतो. त्यांच्यासोबत काम केल्याने शिस्त लागते. कारण ते वेळेवर उठतात. व्यायाम आणि काम करुन वेळेवर झोपतात.

  • 'आर्मी ऑफ द डॅड’मध्ये हा हॉलिवूडपट कसा मिळाला?

एलएमध्ये कास्टिंग दिग्दर्शकाला भेटले होते, त्यांच्या माध्यमातून प्राेजेक्ट मिळाला. हॉलिवूडमध्ये काम करुन खूप चांगले वाटले. कारण मला शिस्तीत काम करणे आवडते. ते वेळेवर काम सुरू करतात आणि वेळेवर संपवतात.

  • आगामी प्रोजेक्ट्स कोणते आहेत ?

मे महिन्यात खूप काम होते. आताच हॉलिवूडचा 'आर्मी ऑफ द डेड’ रिलीज झाला. लाेकांकडून बऱ्याच शुभेच्छा मिळाल्या. आता महाराणी रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त दिल्लीत कोरोना रुग्णांसाठी 100 खाटांचे रुग्णालय उघडत आहे. त्यामुळे सध्या व्यग्र आहे.

बातम्या आणखी आहेत...