आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्रा पॉर्न केस:'हंगामा 2' चे निर्माते रतन जैन यांनी घेतली शिल्पा शेट्टीची बाजू, म्हणाले - 'ती असे कोणतेही काम करू शकत नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रतन जैन म्हणाले, 'ती असे कधीच करू शकत नाही'

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. त्याला 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज मुंबईच्या कोर्टाने फेटाळला असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीच्या करिअरवर मोठा परिणाम झाला आहे. तिच्या हातून बरेच प्रोजेक्ट निसटले आहेत. शिल्पा राज कुंद्राच्या अनेक कंपन्यांमध्ये त्याची पार्टनर आहे. दरम्यान नुकताच तिचा कमबॅक चित्रपट 'हंगामा 2' प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन असून ते शिल्पाच्या समर्थनार्थ पुढे आहे आहेत. शिल्पाने 'हंगामा 2' पूर्वी रतन जैन यांच्या 'धडकन' आणि 'हथियार' या चित्रपटांमध्ये काम केले होते.

रतन जैन म्हणाले, 'ती असे कधीच करू शकत नाही'
रतन जैन म्हणाले, 'मी जेवढे शिल्पाला ओळखतो त्यावरुन ती अशा प्रकरणात सामील असेल असे मला वाटत नाही. मी असेही म्हणू शकत नाही की शिल्पाला तिच्या नव-याच्या बिझनेसविषयी माहिती नव्हते. पण ती असे काम करु शकत नाही. मला नाही वाटत या प्रकरणामध्ये शिल्पा सहभागी असेल. मी शिल्पाला ओळखतो त्यामुळे ती असे काम करणार नाही. आपण तपास यंत्रणेवर हे प्रकरण सोडायला हवे, ते याचा तपास करत आहेत.'

शिल्पा चित्रीकरण करत नाहीये
राज कुंद्रा प्रकरणाचा परिणाम शिल्पाच्या कारकीर्दीवरही होत आहे. शिल्पाने तब्बल 14 वर्षांनंतर ‘हंगामा 2’ या चित्रपटाद्वारे चित्रपटांत कमबॅक केले, पण राजच्या अटकेमुळे चित्रपटावरही परिणाम दिसून आला. याशिवाय शिल्पाला सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या शूटिंगमधूनही माघार घ्यावी लागली आहे. ती या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे पण मागील दोन आठवड्यांपासून ती शूटिंगवर पोहोचली नाही.

बातम्या आणखी आहेत...