आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2019 मध्ये हैदराबाद सामूहिक बलात्काराने देशात खळबळ उडाली होती. लाखो लोकांनी पीडितेला न्याय मिळण्यासाठी आवाज उठवला होता. सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन सारखे अनेक मोठे स्टार्स सुद्धा या लोकांमध्ये सामील होते. या दरम्यान, अनेकांनी सोशल मीडिया अकाऊंटवर छायाचित्रेही शेअर केली होती. या बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त 38 सेलेब्सवर बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीस्थित वकील गौरव गुलाटी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूड स्टार्स व्यतिरिक्त यात टॉलिवूड अभिनेते, क्रिकेटपटू आणि आरजे यांचाही समावेश आहे. गौरव यांचे म्हणणे आहे की हे कलाकार लोकांसाठी एक उदाहरण बनले पाहिजेत, पण ते स्वत: कायद्याची पायमल्ली करून बलात्कार पीडितेची ओळख उघड करत आहेत. या सर्व सेलिब्रिटींना अटक झाली पाहिजे.
या सेलेब्सविरोधात तक्रार दाखल
वकील गौरव गुलाटी यांनी सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, अनुपम खेर, परिणीती चोप्रा, दिया मिर्झा, स्वरा भास्कर, रकुल प्रीत सिंग, यामी गौतम, ऋचा चढ्ढा, काजल अग्रवाल, शबाना आझमी, हंसिका मोटवानी, प्रिया मलिक, अरमान मलिक, करणवीर वोहरा, दिग्दर्शक मधुर भांडारकर, दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजा, अल्लू शिरीष, क्रिकेटपटू हरभजन सिंग, शिखर धवन, निधी अग्रवाल, चार्मी कौर, आशिका रंगनाथ आणि आरजे सायमा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
हैदराबाद पोलिसांनी दिशा बलात्काराच्या आरोपींना एनकाउंटरमध्ये केले ठार
हैदराबादमध्ये 28 नोव्हेंबर 2019 च्या रात्री एका वेटनरी डॉक्टरचे अपहरण करण्यात आले. 4 आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिला जाळले.या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. घटनेनंतर दोन दिवसात आरोपींना अटक करण्यात आली.
घटनास्थळी रि-क्रिएशनदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले होते. या संपूर्ण प्रकरणाला दिशा बलात्कार प्रकरण असे नाव देण्यात आले. सेलेब्सने या प्रकरणी ट्विट केले होते. ज्यात त्यांनी बलात्कार पीडितेची ओळख उघड केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.