आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतनीस तारे:फेसबुकवर सर्वात मोठा फंड संकलन करणारा कार्यक्रम ठरला 'आय फॉर इंडिया', कोरोना पीडितांसाठी जमवले 52 कोटी रुपये, देणगीचा ओघ सुरुच 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारांनी आय कॅन, आय विल, आय मस्ट हेल्प ही घोषणा पुन्हा देऊन मदतीचे आवाहन केले होते.

बॉलिवूड, हॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील तारे-तारकांनी 3 मे रोजी  देशातील सर्वात मोठा व्हर्च्युअल कॉन्सर्ट फेसबुकवर लाइव्ह केला होता.  या कार्यक्रमाचा हेतू कोरोना पीडितांसाठी निधी जमा करणे हा होता. या कलाकारांच्या प्रयत्नांना यश आले. करण जोहरने या कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीची माहिती शेअर केली आहे.

करण आणि झोया अख्तर या कार्यक्रमाचे मुख्य सुत्रधार होते. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले- फेसबुकवर जगातील सर्वात मोठा फंड रेझर म्हणून 'आय फॉर इंडिया'ने 52 कोटी रुपये उभे केले आहेत आणि हा ओघ अजूनही सुरू आहे. या निधीत 4.3 कोटी रुपये ऑनलाइन आणि कार्पोरेट देणगीदारांकडून 47.77  कोटी रुपये मिळाले आहेत. मदतीचा हा ओघ अजूनही सुरु आहे. संपूर्ण निधी कोविड -19 रिलीफला जाईल.

रविवारी 3 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या मैफिलीत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, गुलजार, ए.आर. रहमान, जावेद अख्तर, ब्रायन अ‍ॅडम्स, विल स्मिथ, सोनू निगम, हृतिक रोशन, निक जोनास, विक्की कौशल, आयुष्मान खुराणा, कपिल शर्मा, उस्ताद अमजद अली खान, अनुष्का शंकर, प्रियांका चोप्रा, आमिर खान, अनिल कपूर, रणवीर सिंग, अभिषेक बच्चन अशा 85 हून अधिक कलाकारांनी आपले सादरीकरण केले आणि संदेश दिला. गिव इंडिया प्लॅटफॉर्मला अर्थसहाय्य देण्यासाठी कलाकारांनी आय कॅन, आय विल, आय मस्ट हेल्प ही घोषणा पुन्हा देऊन मदतीचे आवाहन केले होते.

बातम्या आणखी आहेत...