आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. मागील दोन दिवसांपासून कंगनाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर अनेक आक्षेपार्ह ट्विट केले होते. मात्र असे वादग्रस्त ट्विट करणे तिला महागात पडले. कारण ट्विरटकडून कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. कंगना वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत तिचे अकाउंट कायमचे बंद करण्यात येत असल्याचे ट्विटरकडून जाहीर करण्यात आले आहे.
एवढे होऊनदेखील शांत बसेल ती कंगना नाही... ट्विटरच्या या निर्णयानंतर कंगनाने तिची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीला काही फोटो शेअर करत ट्विटरच्या कारवाईनंतरचे आपले मत मांडले आहे. यात कंगना म्हणाली की, 'मी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ट्विटरने माझे अकाऊंट बंद केले आहे.'
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कंगनाने ट्विटरवर पलटवार केले आहेत. 'ट्विटरने फक्त माझा मुद्दा सिद्ध केला आहे की, ते जन्माने अमेरिकन आहेत. गहुवर्णीय लोकांना गुलाम बनवणे हा आपला हक्क आहे, असे अमेरिकेला वाटते. आपण काय विचार करावा, आपण काय बोलावे आणि काय करावे हे ते ठरवतात. आवाज उठवण्यासाठी नशीबाने माझ्याकडे इतर पर्याय देखील आहेत. शिवाय माझ्या कलाकृतींच्या मदतीने देखील मी माझे मत मांडू शकते.' असे कंगना म्हणाली आहे.
कंगनाने आपल्या आक्षेपार्ह ट्विटमध्ये ममता बॅनर्जींची तुलना केली होती रावणाशी
कंगनाने आपल्या आक्षेपार्ह ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांची तुलना रावणाशी केली होती. तर बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांसाठी कंगनाने तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्याचप्रमाणे या हा हिंसाचार थांबवण्यासाठी तिने पंतप्रधान मोदी यांना 2000 सालचं उग्र रूप दाखवण्याची विनंती केली होती. त्यावरून युझर्सनी याचा संबंध 2000 साली झालेल्या गुजरात दंग्यांशी जोडत कंगना हिंसाचारासाठी अनुकूल वातावरण तयार करत असल्याचे म्हटले होते. या सर्व ट्विटमुळे कंगनाचे अकाउंट सस्पेन्ड करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.