आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी अलीकडेच इंडियन आयडॉल या सांगितिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शोमध्ये परीक्षक नेहा कक्कर हिने संतोष आनंद यांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. वृत्तानुसार, संतोष आनंद यांनी आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असून त्यांच्याकडे उपचारांसाठी आणि उदरनिर्वाहासाठी पैसे नाहीत. त्यामुळेच त्यांना इंडियन आयडॉलमध्ये आमंत्रित करुन नेहाने पाच लाखांची मदत केली. मात्र संतोष आनंद यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटल्यानुसार, एका कलाकाराला फक्त आदर आणि सन्मान हवा असतो. माझी आठवण काढली हे बघून चांगले वाटले, मात्र नंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्या चुकीच्या आहेत.
आर्थिक अडचणीत नाही - संतोष आनंद
संतोष आनंद पुढे म्हणाले, माझे घर व्यवस्थित चालू आहे. नेहा खूप छान व्यक्ती आहे जेव्हा तिने मला पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली तेव्हा मी म्हणालो की मी ते घेऊ शकत नाही. मी स्वाभिमानी व्यक्ती आहे. मी कधीही कोणाकडेही पैसे मागितले नाही किंवा कधी मागणारदेखीलनाही. मी कवि संम्मेलनात सहभागी होत असतो आणि तेथून पैसे कमावतो. मला आर्थिक अडचण नाही, त्यामुळे मी कुणाकडे मदत का मागू. मला माहित नाही नेहाने मला ही भेट का दिली. आपली नात समजून हे पैसे घ्या असे जरी तिने म्हटले असते, तरी मी ते घेतले नसते. आता लोक ज्या काही गोष्टी करत आहेत, त्यात तथ्य नाही. स्टेजवर बोलावले, सन्मान दिला, तेच माझ्यासाठी खूप आहे. सन्मान आणि मदत यात फरक आहे. मला मदतीची गरज नाही.'
व्हीलचेअरवर आहेत संतोष आनंद
संतोष आनंद यांची प्रकृती ठिक नसून ते व्हीलचेअरवर आहेत. त्यांना लग्नाच्या दहा वर्षांनी मुलगा झाला होता, त्याचे नाव त्यांनी संकल्प ठेवले होते. 15 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांच्या मुलाने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली होती.
ही आहेत संतोष कुमार यांनी लिहिली प्रसिद्ध गाणी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.