आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवू़डमधील ड्रग्ज कनेक्शन:'मी कधीही ड्रग्ज खरेदी किंवा त्याचे सेवन केलेले नाही', ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर दीया मिर्झाचे स्पष्टीकरण

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीया मिर्झा म्हणाली, माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळते.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोेण आणि नम्रता शिरोडकर यांच्यानंतर आता दीया मिर्झाचे नाव समोर आले आहे. वृत्तानुसार, ड्रग पेडलर अनुज केशवानीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)च्या चौकशीत 38 वर्षीय दीया मिर्झाच्या नावाचा उल्लेख केला आहे. रिपोर्ट्सनुसार अनुज केशवानीने एनसीबीला सांगितले की, दीया मिर्झाची मॅनेजर ड्रग्ज खरेदी करत असे. 2019 मध्ये दीयाच्या मॅनेजरने ड्रग्ज खरेदी केल्याचे पुरावेही केशवानीने दिले आहेत. त्यामुळे एनसीबी दीयाला समन्स पाठवू शकते. मात्र या प्रकरणात नाव आल्यानंतर कुठलीही कारवाई होण्यापूर्वी दीयाने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यावरील सर्व आरोप तिने फेटाळून लावले आहेत.

दीयाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये दिया म्हणाली, 'माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळते. हे आरोप खोटे, निराधार आणि वाईट प्रवृत्तीतून करण्यात आले आहे. अशा पत्रकारितेचा थेट परिणाम माझ्या प्रतिष्ठेवर होईल. मी खूप मेहनतीने उभे केलेले माझे करिअर यामुळे उद्धवस्त होईल. मी माझ्या आयुष्यात कधीच ड्रग्ज खरेदी केले नाही आणि त्याचे सेवनही केलेले नाही,' असे दीया म्हणाली आहे.

सोबतच तिने आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभारदेखील व्यक्त केले आहेत.

सोमवारी दीपिका पदुकोणचे नाव आले होते समोर
सोमवारी दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले. ड्रग्जबाबत हे चॅट्स 28 ऑक्टोबर 2017 चे आहेत. यात ‘डी’ हा काेडवर्ड दीपिकासाठी असल्याचे
सांगितले जाते. एका चॅनलच्या दाव्यानुसार, चॅटमध्ये दीपिका “के’ला “माल’बाबत विचारते. ती उत्तरते, हे तिच्याकडे आहे, मात्र घरी ठेवलेले आहे. नंतर “के’ म्हणते की ती तिला काय हवे आहे ती
'अमित’ला विचारू शकते. दीपिका स्पष्ट करते की तिला 'हॅश' हवे आहे, 'वीड’ नव्हे.

दीपिकाची मॅनेजर म्हणून काम करणारी करिश्मा प्रकाश 'क्वान' नावाच्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीत काम करते. ही कंपनी 40 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीत काम करते. जया करिष्माची सीनिअर आहे. एनसीबी, सीबीआय आणि ईडीच्या पथकाने अनेकदा जयाची चौकशी केली. चौकशीदरम्यान एनसीबीला जया आणि करिश्मा यांच्यातील चॅटसंदर्भात माहिती मिळाली. यानंतर हे प्रकरण दीपिकापर्यंत पोहोचले. याप्रकरणी दीपिकालासुद्धा समन्स पाठवले जाऊ शकते.

दीपिका, दीया आणि मधु यांच्याव्यतिरिक्त, ड्रग्ज कनेक्शनमध्ये रकुल प्रीत सिंग, सारा अली खान, नम्रता शिरोडकर आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावेही समोर आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...