आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसरा दिवस:सोनू सूदच्या ऑफिस, हॉटेलसह 6 ठिकाणी 20 तास IT च्या पथकाने रेकॉर्ड तपासले, स्टाफ आणि कुटुंबीयांचीही चौकशी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 तासांच्या चौकशीत सोनूचे अकाउंट बुक्स, उत्पन्न, खर्च आणि इतर आर्थिक बाबी तापसल्या गेल्या.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईस्थित ऑफिसमध्ये इनकम टॅक्सचा तपास दुस-या दिवशीही सुरु आहे. बुधवारी संध्याकाळी सुरु झालेला तपास गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होता. 20 तासांच्या चौकशीनंतर इनकम टॅक्सची टीम सोनूच्या घर आणि कार्यालयाबाहेर पडली. त्यानंतर काही वेळाने पुन्हा चौकशी सुरु झाली. बुधवारी अधिका-यांनी सोनूचे कुटुंबीय आणि त्याच्या स्टाफकडे देखील विचारपूस केली. अधिका-यांनी सोनूच्या घरातून काही फाइल्स आणि कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. 20 तासांच्या चौकशीत सोनूचे अकाउंट बुक्स, उत्पन्न, खर्च आणि इतर आर्थिक बाबी तापसल्या गेल्या.​​​​​​

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा मसीहा म्हणून ओळखला जाऊ लागला. हजारो गरीब मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनूने मदत केली होती. तो 'सूद चॅरिटी फाउंडेशन' नावाची एक स्वयंसेवी संस्थाही चालवत आहे. ही स्वयंसेवी संस्था आरोग्य सेवा, शिक्षण, नोकऱ्या आणि तंत्रज्ञान प्रगतीवर काम करते. आयटी अधिकाऱ्यांनीही येथे जाऊन पाहणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभाग 'रिअल इस्टेट डीलची चौकशी करत आहे'. आय-टी अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील काही भागातही शोध घेतला आहे. पण आयटी विभागाने दावा केला की, हे दोन्ही स्वतंत्र ऑपरेशन होते. यूपीची कारवाई कंत्राटदारासोबतच्या व्यवहाराशी संबंधित आहे.

काही दिवसांपूर्वी तो आप पक्षाच्या एका मोहिमेसोबत जुळला होता
सोनू सूदवर केलेली ही कारवाई भाजपकडून राजकीय सूडबुद्धीने सुरू असल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. 27 ऑगस्टलाच सोनू सूद याची 'देशाचे मेंटोर' मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली होती. त्यानंतरच आता आयकर विभागाकडून केलेली कारवाई केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

सोनू सूदला यावेळी राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आले होते. यावेळी त्याने आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आम आदमी पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

अरविंद केजरीवाल यांनी केले ट्विट
या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सूदच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, 'सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात, पण सत्याचा नेहमीच विजय होतो. सोनू सूद यांच्यासोबत भारताच्या लाखो कुटुंबांच्या प्रार्थना आहेत ज्यांना कठीण काळात सोनू यांचा पाठिंबा मिळाला होता.'

संयुक्त राष्ट्र संघाने केला होता सोनूचा सन्मान
48 वर्षीय सोनू हिंदी, तेलुगु, कन्नड आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम करतो. लवकरच तो 'पृथ्वीराज' या पीरियड ड्रामामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो तेलुगू अ‍ॅक्शन-ड्रामा 'आचार्य'मध्येही काम करत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, सोनूला कोरोना महामारी दरम्यान मानवतावादी कार्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) द्वारे 2020 SDG विशेष मानवतावादी कृती पुरस्कार देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...