आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्रा अटकेत:पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी राज कुंद्रा दोषी आढळला तर जाणून घ्या किती वर्षांची होऊ शकते शिक्षा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, काय शिक्षा होऊ शकते?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक केली आहे. राजच्या विरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली असल्याचे समजते. कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप असून याच प्रकरणी त्याला अटक झाली आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितल्यानुसार, राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून त्याच्याविरूद्ध आमच्याकडे पुरावे आहेत.

या कलमांखाली राज कुंद्रावर खटला चालवला गेला

  • भादंवी कलम 292, 296 - अश्लील सामग्री बनविणे आणि विक्री करणे
  • कलम 420 - विश्वासघात, फसवणूक
  • माहिती तंत्रज्ञान कायदा कलम, 67, 67 (A) - इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री टाकणे आणि ती प्रसारित करणे
  • कलम 2 (जी) 3, 4, 6, 7 - महिलांशी संबंधित अश्लील चित्रपट बनविणे, विक्री करणे आणि त्याचा प्रसार करणे.

अश्लीलताविरोधी कायदा

इंटरनेटद्वारे पोर्नोग्राफीचा व्यापार या दिवसेंदिवस वेगाने वाढला आहे. यामुळेच पोर्नोग्राफी हा मोठा व्यवसाय झाला आहे. पोर्नोग्राफीमध्ये फोटो, व्हिडिओ, मजकूर, ऑडिओ यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. अशाप्रकारचा कंटेंट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे, इतरांना पाठवणे किंवा इतरांमार्फत ते प्रकाशित करणे यासाठी अँटी-पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

अश्लील व्हिडिओ बनवणे बेकायदेशीर
इतरांचे अश्लील व्हिडिओ बनवणे, एमएमएस बनवणे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इतरांना ते उपलब्ध करुन देणे हे अश्लीलताविरोधी कायद्याच्या कार्यक्षेत्रात येते. तसेच, हा कायदा बेकायदेशीर किंवा संमतीशिवाय कोणालाही अश्लील सामग्री पाठवणाऱ्यांना लागू आहे. अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा पाठवणे बेकायदेशीर आहे. सोबतच ते पाहण्यावर, ऐकण्यावर आणि वाचण्यावर कोणतीही बंदी नाही. परंतु, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे बेकायदेशीर आहे.

काय शिक्षा होऊ शकते?
अश्लीलताविरोधी कायद्या अंतर्गत येणार्‍या प्रकरणांमध्ये आयटी कायदा 2009 च्या कलम 67 (अ) आणि आयपीसीच्या कलम 292, 293, 294, 500, 506 व 509 अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. पहिल्या गुन्ह्यात गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार 5 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पण, अशा गुन्ह्यात दुसऱ्यांदा पकडल्यास तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...