आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Imran Hashmi Working With Amitabh Bachchan For The First Time In 'Chehre', Said 'I Bothered Amitji A Lot On The Set, Because I Had A Lot Of Questions To Ask Him'

मुलाखत:‘चेहरे’मध्ये अमिताभ बच्चनसोबत पहिल्यांदाच दिसणार इम्रान हाश्मी, म्हणाला - 'मी सेटवर अमितजींना खूप त्रास दिला, कारण त्यांना विचारण्यासाठी माझ्याकडे बरेच प्रश्न होते'

उमेशकुमार उपाध्याय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इम्रान हाश्मीसोबतची खास बातचीत...

दीर्घकाळानंतर अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा मुख्य अभिनय असलेला “चेहरे’ २७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इम्रानने दिव्य मराठीसोबत झालेल्या मुलाखतीत या चित्रपटाच्या शूटिंगविषयी आणि अमिताभसोबत पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव सांगितला...

या चित्रपटात तुझे पात्र कसे आहे ?
मी यात एका जाहिरात एजन्सीच्या मालकाची भूमिका करत आहे, तो यशस्वी असतो. एका भयाण ठिकाणी त्याची गाडी बिघडते. त्यामुळे तो एका घरात शरण घेतो. त्या घरात निवृत्त न्यायाधीश अमिताभ बच्चन राहतात. अमितजी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत वेळ घालवण्यासाठी एक खेळ खेळतात. तो अनोखा खेळ असतो. प्रत्येक माणूस यशस्वी होण्यासाठी काही ना काही चुकीचे काम करतो, असे म्हणून ते माझ्या जीवनातील प्रत्येक गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ते काय आहे, ते चित्रपटातच पाहायला मिळेल.

अमिताभ बच्चन, अनू कपूर, रघुवीर यादव सारख्या कलाकारांसोबत कामाचा अनुभव कसा होता ?
ही सर्व मंडळी अष्टपैलू आहेत. त्यांच्याकडे कामाचा 40 वर्षांचा अनुभव आहे. मला तर आता फक्त 20 वर्षे झाली आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याच्या आधीच माझ्या पात्राची सर्व माहिती दिग्दर्शकाकडून मिळवुन घेतली. त्याची तयारी केली त्यानंतर सेटवर गेलो. सर्वांच्या कामाची पद्धत वेगवेगळी असते. विशेष म्हणजे, सर्वच शिस्तप्रिय आहेत. दिग्दर्शकांसोबत तयारी करतात. प्रत्येक दृश्यात 100 टक्के देतात.

बच्चन साहेबांसोबतचा एखादा खास अनुभव सांगा?
मी सेटवर त्यांना खूप त्रास दिला, कारण त्यांना विचारण्यासाठी माझ्याकडे बरेच प्रश्न होते. ते दूरही जाऊ शकत नव्हते, कारण येथे फक्त एका घराचा सेट होता. तेथेच आमचे शूटिंग व्हायचे, ते आम्ही 30 ते 40 दिवस पूर्ण केले. त्यामुळे आम्ही या काळात चित्रपटच नव्हे तर प्रत्येक विषयावर चर्चा केली.

आगामी प्राेजेक्ट कोणते आहेत ?
या व्यतिरिक्त एक हॉरर चित्रपट 'इजरा’ केला आहे. हा एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. आम्ही कोरोनाच्या आधी याचे शूटिंग केले होते. या व्यतिरिक्त काही सिरीज ऑफर झाल्या आहेत. त्यांचे स्क्रिप्ट वाचन सुरू आहे. पण अजून साइन केल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...