आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान यांचा सल्ला:पंतप्रधानांचा पाकिस्तानी फिल्ममेकर्सना सल्ला, म्हणाले - बॉलिवूडच्या चित्रपटांची काॅपी नकाे.. जगात केवळ अस्सलता विकली जाते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात अस्सलता विकली जाते - इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानातील चित्रपट निर्मात्यांना सल्ला दिला आहे. बाॅलिवूडच्या चित्रपटांची नक्कल करू नका. मूळ आशयावर भर देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इस्लामाबाद येथे रविवारी लघुपट महाेत्सवाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा मुद्दा मांडला.

जगात अस्सलता विकली जाते - इम्रान खान
इम्रान खान म्हणाले, पाकिस्तानच्या चित्रपटाने सुरुवातीला भारतीय सिनेमाची नक्कल केली. सुरुवातीला चुका केल्या कारण पाकिस्तानच्या चित्रपट उद्याेगावर बाॅलिवूडचा प्रभाव होता. त्यामुळे संस्कृतीची देखील नक्कल झाली. स्वीकारली गेली. परंतु आता आपल्याला आपल्या मूळ आशयावर लक्ष दिले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गाेष्ट म्हणजे जगात अस्सलता विकली जाते.

इम्रान खान यांनी तरुण फिल्ममेकर्सना दिला सल्ला
इम्रान खान पुढे म्हणाले, तरुण चित्रपट कलावंत, निर्मात्यांना माझा हाच सल्ला आहे. त्यांनी आशयाच्या अस्सलतेवर भर दिला पाहिजे. अपयशाला घाबरून जाण्याची गरज नाही. पराभवाची भीती बाळगली तर विजय मिळू शकत नाही, हा माझा अनुभव आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...