आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करतोय इमरान खान!:एकमेकांचा हात हातात पकडून दिसले, नेटकऱ्यांना आवडली दोघांची केमिस्ट्री

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खान दीर्घ काळानंतर रविवारी (5 फेब्रुवारी) सार्वजनिक ठिकाणी दिसला. यावेळी दाक्षिणात्य अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत त्याच्यासोबत होती. दोघांनाही एकमेकांचा हात हातात पकडला होता. दोघांचे फोटो समोर आल्यापासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावेळी इमरान ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. तर लेखा प्रिंटेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसली.

इमरान आणि लेखाची केमिस्ट्री दिसली कूल
आता सोशल मीडियावर इमरान आणि लेखाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसत आहेत. दरम्यान दोघेही पूर्ण वेळ एकमेकांचा हात हातात धरुन दिसले. त्यांची केमिस्ट्री अतिशय कूल दिसली. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, 'आता इमरान लेखाला डेट करत आहे.' आणखी एकाने लिहिले, 'इमरानला आनंदी पाहून खूप छान वाटले.' तर काहींच्या म्हणण्यानुसार, लेखासोबतच्या अफेअरमुळे त्याने अवंतिकापासून घटस्फोट घेतला.

लेखा वॉशिंग्टन कोण आहे?
लेखा वॉशिंग्टन ही तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. यासोबतच लेखा ही प्रोडक्ट डिझायनर देखील आहे. लेखा वॉशिंग्टनने 1999 मध्ये साऊथ चित्रपटांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती व्हिडिओ जॉकी बनली. यासोबतच तिने 'युवा', 'मटरू की बिजली का मंडोला', 'पीटर गया काम से'सह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

लेखाच्या पुर्वाश्रमीच्या पतीचा जवळचा मित्र होता इमरान
लेखाचा पुर्वाश्रमीचा पती पाब्लो चॅटर्जी आणि इमरान हे जवळचे मित्र होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इमरानने घटस्फोटापूर्वी लेखाला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ एक घर भाड्याने घेतले होते. इमरानच्या शेजाऱ्यांनी लेखाला अनेकदा इमारतीत येताना पाहिल्याचे सांगितले. अवंतिकापासून घटस्फोट घेतल्यानंतर इमरानने आता आपले नाते अधिकृत केले आहे.

2011 मध्ये झाले होते इमरान खानचे पहिले लग्न
'जाने तू या जाने ना' या पहिल्याच चित्रपटातून इमरान खानने चाहत्यांच्या मनात स्वतःचे खास स्थान निर्माण केले. मात्र 2015 मध्ये त्याने अभिनयाला रामराम ठोकला. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर इमरानचे पहिले लग्न अवंतिका मलिकसोबत झाले होते. अवंतिका आणि इमरान यांनी 2011 मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघे 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना इमायरा ही एक मुलगी आहे. 2019 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या आल्या होत्या. आता अवंतिका मलिक साहिब सिंह लांबाला डेट करत असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...