आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरच्या भाच्याने अभिनय सोडला:इम्रानने अभिनय सोडू नये अशी होती पत्नीची इच्छा, सास-यांचा खुलासा - यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेगळी राहतेय अवंतिका

बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान सध्या अभिनय करिअर सोडल्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याचा जवळचा मित्र अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. इम्रान यापुढे चित्रपटांत काम करणार नाही. त्याने अभिनय सोडला आहे. इम्रान अभिनय सोडून दिग्दर्शनात पाऊल टाकेल अशी आशा असल्याचे अक्षय म्हणाला आहे. मात्र अद्याप इम्रानने याबाबत अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यामुळे कदाचित ही बातमी चुकीची असू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता इम्रानचे सासरे रंजेव मलिक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इम्रानने अभिनय सोडल्याबद्दल अवंतिकाने घेतला होता आक्षेप
रंजेव मलिक म्हणाले, 'खरं सांगायचं तर हा इम्रानचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मला यात काही जास्त बोलायचे नाही. पण हो, अॅक्टिंग स्कूलमध्ये असल्यापासून इम्रानचा दिग्दर्शनाकडे कल होता. तो त्यावर काम करत आहे आणि लवकरच दिग्दर्शनही करेल.'

रंजेव मलिक यांनी पुढे सांगितल्यानुसार, इम्रान आणि अवंतिका यांच्यातील वादाचे हे देखील एक कारण राहिले आहे. इम्रानने आपले अभिनय करिअर थांबवू नये आणि ते पुढे न्यावे अशी अवंतिकाची इच्छा होती. इम्रानने हे प्रकरण कसे तरी हाताळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की जर अभिनेता म्हणून त्याला चांगली भूमिका मिळाली तर तो ती नक्कीच करेल.

अभिनय करिअरमधून संन्यास घेण्याच्या निर्णयावर इम्रानने कुणाशीही चर्चा केली नाही. त्याला आपल्या करिअरच्या निर्णयात कुणाचाही हस्तक्षेप आवडत नसल्याचे रंजेव मलिक यांनी सांगितले.

वेगळी राहतेय अवंतिका

गेल्या दोन वर्षांपासून इम्रान-अवंतिका यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. 24 मे 2019 रोजी अवंतिका इम्रानचे घर सोडून मुलगी इमारासोबत आपल्या आईवडिलांकडे राहत आहे. दोघांच्या कुटुंबियांनी इम्रान आणि अवंतिका यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. 8 वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केले होते. हे दोघे 2014 मध्ये मुलगी इमाराचे आईवडील झाले.

इम्रानने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘कयामत से कयामत तक’ (1988) या चित्रपटात त्याने आमिरच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय‘जो जिता वही सिकंदर’ (1992) मध्येही झळकला होता. 2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. अखेरचा तो 'कट्टी बट्टी' या चित्रपटात दिसला होता. याशिवाय इम्रानने ‘देल्ली बेल्ली’, 'किडनॅप', 'लक', 'आय हेट लव्ह स्टोरी' अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...