आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Imran Kunal Will Meet Next Year On 'Jannat 3', Imran Is Currently Busy In 'Tiger 3', Kunal Will Complete Netflix's Series After 'Shiddat'

अपकमिंग फिल्म:पुढच्या वर्षी 'जन्नत 3’वर काम सुरू करणार दिग्दर्शक कुणाल देशमुख आणि इम्रान खान, पुन्हा एकदा अँटी हीरोच्या भूमिकेत दिसू शकतो अभिनेता; सध्या 'टायगर 3' मध्ये बिझी

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिला 'जन्नत' हा चित्रपट 2008 मध्ये तर दुसरा भाग 2012 मध्ये आला होता. तिस-या भागासाठी नऊ वर्षांची प्रतिक्षा

‘जन्नत’ फेम दिग्दर्शक कुणाल देशमुखचा आगामी चित्रपट ‘शिद्दत’आहे. तो पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तो पुन्हा एकदा इम्रान हाश्मीसोबत ‘जन्नत 3’ वर काम करणार आहे. मात्र या चित्रपटावर पुढच्या वर्षीच काम होणार आहे. याविषयी बोलताना कुणालने सांगितले, अनेक लोक या फ्रँचायझीच्या तिस-या भागाची वाट पाहत आहेत. याचे निर्मातेदेखील याचा तिसरा भाग बनवू पाहत आहेत. मी आणि इम्रान तर प्रत्येक भेटीत यावर चर्चा करत असतो की, याचा पुढचा भाग कसा असेल. सध्या इम्रान खूपच व्यग्र आहे. तो सध्या ‘टायगर 3’ सारखा मोठा चित्रपट करत आहे. त्यामुळे आम्ही ‘जन्नत 3’वर वेळ मिळेल तशी चर्चा करत असतो.

नवे पात्र रचले जाईल
कुणालने सांगितले, आम्ही याच्या तिसऱ्या भागासाठी एक कथा तयार करत आहाेत. ती मागील दोन्ही चित्रपटापासून थोडी वेगळी असेल. पहिल्या भागात इम्रान बुकीच्या भूमिकेत होता, तर दुसऱ्या भागात तो अवैधरीत्या बंदुका विकत होता. आता तिसऱ्या भागात इम्रानचे पात्र नवे असणार आहे. निर्मातेदेखील माझ्या दृष्टिकोनातून कथेत नवा बदल करण्याचा विचार करत आहेत. इम्रान अँटी हीरोच्या भूमिकेत चांगला दिसतो. त्याचे आजपर्यंतचे हे रेकॉर्ड आहे. ते त्याने ‘गँगस्टर’पासून कायम ठेवले आहे.

पुढच्या वर्षी मेमध्ये काम सुरू होण्याची शक्यता
हा चित्रपट कधी सुरू होणार, असे विचारले असता कुणाल म्हणाला, “आम्ही इम्रानशिवाय ‘जन्नत 3’ बनवू शकणार नाही. पुढच्या वर्षी मे महिन्यानंतर त्यावर काम सुरू होऊ शकते. तोपर्यंत मी नेटफ्लिक्स मालिकेचे शूटिंगही पूर्ण करून घेईन”

चित्रपटगृहात प्रदर्शित न होण्याचे दु:ख
'शिद्दत' या चित्रपटाबद्दल कुणाल म्हणाला, 'निर्मात्यांनी ओटीटीवर ‘शिद्दत’ रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहांत या चित्रपटाने जादू केली असती. या वेब प्लॅटफॉर्मवर तो जादू करू शकणार नाही, असे मला वाटते. कारण प्रत्येक चित्रपट त्याचे प्रेक्षक शोधत असतो. ही एक महाकाव्य प्रेमकथा आहे. यात हीरोचा दृष्टिकोन कथेत नावीन्य आणतो. जग्गी जिद्दी लोकांपैकी एक आहे, तो आपले प्रेम शोधण्यासाठी व्हिसा, पासपोर्टशिवाय भारतातून इंग्लंडला पोहोचतो.'

'गोल्ड' आणि 'पटाखा'पाहून केली निवड
या चित्रपटासाठी मोहित रैना आणि सनी कौशलच माझी पहिली पसंत होते. मोहितचे काम मला ‘देवों के देव महादेव’मध्ये प्रचंड आवडले होते. दुसरीकडे सनीला मी ‘गोल्ड’मध्ये पाहून हैराण झालो होतो. याव्यतिरिक्त राधिका मदानचा ‘पटाखा’ पाहून मी प्रभावित झालो होतो. शिवाय तिचे नाव निर्माते दिनेश विजन यांनी सुचवले होते.

बातम्या आणखी आहेत...