आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकीच्या जन्माआधीच आलियाने ठरवले होते तिचे नाव:रिअ‍ॅलिटी शोमध्ये आलिया म्हणाली होती, मुलगी झाली तर तिचे नाव मी अलमा ठेवेन

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. 6 नोव्हेंबरला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, आलियाचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यामध्ये तिने लेकीच्या जन्माआधीच तिचे नाव जाहीर केले होते. हा व्हिडिओ आलियाच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. जेव्हा ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रणवीर सिंगसोबत 'सुपर डान्सर 3'च्या सेटवर पोहोचली होती. यावेळी तिने मुलगी झाली तर तिचे नाव काय ठेवणार हे सांगितले होते.

झाले असे होते की, रिअ‍ॅलिटी शोमध्ये सक्षम शर्मा नावाच्या स्पर्धकाला शोमध्ये आलियाच्या नावाचे स्पेलिंग विचारण्यात आले, जे सक्षमने 'ए एल एम ए ए (ALMAA) असे सांगितले. याचा अर्थ अलमा असा होता. त्यावेळी आलियाला हे नाव इतके आवडले होते की, जर मला मुलगी झाली तर तिचे नाव मी अलमा असेच ठेवेन, हे अतिशय सुंदर नाव आहे, असे आलिया म्हणाली होती. सध्या आलियाचा हा जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

आजी झालेल्या नीतू यांच्या चेह-यावर ओसंडून वाहतोय आनंद
कपूरांच्या घरी लेकीचे आगमन झाल्याने सर्वजण प्रचंड आनंदात आहे. आजी झाल्याचा आनंद नीतू कपूर यांच्या चेह-यावर स्पष्ट बघायला मिळतोय. नीतू यांच्याकडे पापाराझींनी आलिया आणि बाळाच्या प्रकृतीविषयी विचारणा केली होती. 'आलिया आणि तिचे बाळ एकदम छान आहे. दोघींची प्रकृती चांगली आहे,' असे नीतू कपूर म्हणाल्या. पापीराझींनी नीतू कपूर यांना नात कोणासारखी दिसते?, असा प्रश्नही विचारला. यावर नीतू कपूर म्हणाल्या, 'अजून बाळ लहान आहे. त्यामुळे ती रणबीरसारखी दिसते की आलियासारखी हे सांगणे कठीण आहे.' नातीच्या जन्मानंतर नीतू कपूर फारच आनंदी असल्याचे दिसून आले.

बाळाला बघण्यासाठी करीना उत्सुक
आलियाने आई झाल्याची गोड बातमी तिच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे चाहत्यांना दिली. आलियाने तिच्या इंस्चाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. 'आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती खूप मनमोहक आहे. आज अधिकृतरित्या आम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद मिळालेले पालक आहोत. खूप खूप प्रेम, आलिया आणि रणबीर', असे तिने पोस्टमध्ये म्हटले.

आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला. या पोस्टवरील करीना कपूरची कमेंट चर्चेत आहे. करीनाने आलियाच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या गोंडस मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'उफ माझी छोटी आलिया. तिला पाहण्यासाठी उत्सुक आहे', अशी कमेंट केली आहे. करीना सध्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...