आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • In An Interview, It Was Revealed That The Full Payment Of The Song 'So Much Shakti Hum Dena Daata' Was Not Received Nor Did It Get Its Royalty.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विपन्नावस्थेतच अभिलाष यांचे निधन:‘इतनी शक्ति हमें देना’या गीताचा पूर्ण माेबदला मिळाला नाही, राॅयल्टीबाबत पत्नी अनभिज्ञ; एका मुलाखतीत स्वतः केला होता खुलासा

उमेशकुमार उपाध्याय, मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जन्म : 13 मार्च 1946, मृत्यू : 27 सप्टें. 2020
  • 35 वर्षांपूर्वी अभिलाष यांनी लिहिलेले गीत शाळांतही प्रार्थनेच्या रूपात गायले जात आहे

‘इतनी शक्ति हमें देना दाता...’ सारखे अमर गीत रचणारे गीतकार अभिलाष यांचे आर्थिक चणचणीतच रविवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते यकृताच्या कर्करोगामुळे 10 महिन्यांपासून गंभीर आजारी होते. त्यांचे हे गीत शाळांत प्रार्थना म्हणून गायले जाते. चार वर्षांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत खेदाने सांगितले होते की, गीत तर अमर झाले, पण त्याचे मानधन पूर्ण मिळाले नाही. कोट्यवधी लोक ते कॉलर ट्यून म्हणून वापरत आहेत. या गीताच्या रॉयल्टीबाबत काहीच माहिती नाही, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. हे गीत अमर कसे झाले याची ही कहाणी...

  • 60-70 मुखडे नाकारले गेले, कारमध्ये दोन शब्द समजावून सांगितल्याने तयार झाले गाणे

1985 मध्ये मला ‘अंकुश’ चित्रपट मिळाला. संगीतकार कुलदीपसिंह, निर्माता-दिग्दर्शक एन. चंद्रा. त्यात 4 गाणी होती, ती मलाच लिहायची होती. मी ‘ऊपर वाला क्या मांगेगा हम से कोई हिसाब...’ आणि ‘आया मजा दिलदारा...’ लिहून दिली. ती रेकॉर्डही झाली. पण तिसरे गाणे म्हणजे प्रार्थना आहे, असे एन. चंद्रांनी सांगितले, तेव्हा मी रोज 3-4 मुखडे लिहून देत होतो आणि ते नाकारत होते. मी 60-70 मुखडे लिहून दिले, त्यांनी सर्व नाकारले. अखेर मी त्यांना हे गाणे दुसऱ्याकडून लिहून घ्या असे सांगून फ्लॅटबाहेर पडलो.

माझ्या मागे आलेले संगीतकार कुलदीप सिंह यांनी मला समजावून सांगितले. संध्याकाळची वेळ होती. कुलदीप यांनी मला जुहू येथून आपल्या कारमध्ये बसवले आणि कांदिवलीपर्यंत आले. रस्त्यात ते म्हणाले-‘तुझ्यात मोठी शक्ती आहे... मग कमजोर का पडत आहेस?’ त्यांचे शक्ती आणि कमजोर हे दोन शब्द माझ्या मनात ठसले. तेव्हा मी ‘इतनी शक्ति मुझे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना...’ लिहून कुलदीप यांना ऐकवले, तेव्हा ते म्हणाले, झाला मुखडा तयार.

आम्ही जुहूला परतलो. तेथे एन. चंद्रा, नाना पाटेकर होते. त्यांना मुखडा ऐकवला तेव्हा ते क्षणभर चकित झाले आणि म्हणाले, ‘मला हेच अपेक्षित होते. ’गीत रेकॉर्ड झाले, खूप गाजले. अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे प्रसिद्धीही खूप मिळाली आणि कामही. पण खेदाची बाब म्हणजे मला पूर्ण पेमेंट मिळाले नाही. एन. चंद्रा ‘उद्या ये, परवा ये,’ असे म्हणत. अखेर मीच पेमेंट मागणे सोडून दिले. विशेष गोष्ट म्हणजे या गाण्याची रॉयल्टीही मला मिळाली नाही.

(डिसेंबर 2016 मध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिलाष यांनी उमेशकुमार उपाध्याय यांना दिलेल्या माहितीनुसार.)

बातम्या आणखी आहेत...