आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग खानची क्रेझ:बांगलादेशात 'पठाण'ला हाऊसफुल्लचे बोर्ड, नियमात बदल करून प्रदर्शित करण्यात आला आहे चित्रपट

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठाण’ने जगभरात 1000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची केली आहे. आता हा बांगलादेशातही गाजतोय. येथे प्रदर्शित होणारा ‘पठाण’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. बांगलादेशात 12 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे तूफान प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 48 चित्रपटगृहांत 200 स्क्रीन्सवर ‘पठाण’ प्रदर्शित करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट आणि वितरकांच्या माहितीनुसार पहिल्या दोन दिवसांची तिकीटे विकली गेली असून हा चित्रपट हाऊसफुल्ल ठरला आहे.

यापूर्वी 2009 मध्ये सलमान खानचा 'वाँटेड' हा चित्रपट तेथे प्रदर्शित झाला होता, परंतु वादामुळे तो लवकरच स्क्रीन्सवरुन हटवण्यात आला होता. 1971 मध्ये बांगलादेशची स्थापना झाली. तेव्हापासून एकही हिंदी चित्रपट तेथे प्रदर्शित झाला नव्हता. तब्बल 52 वर्षांनंतर तेथे प्रदर्शित झालेला ‘पठाण’ हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

बांगलादेशात परदेशी चित्रपट प्रदर्शित होत नाहीत
​​​​​यापूर्वी बांगलादेशमध्ये स्थानिक उद्योग वाढवण्यासाठी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी परदेशी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यावर्षी बांगलादेश सरकारने आता त्यांच्या देशात 10 परदेशी चित्रपट व्यावसायिकरित्या प्रदर्शित केले जातील, असा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काही दिवसांत ‘पठाण’ बांगलादेशच्या बॉक्स ऑफिसवरही आणखी धुमाकूळ घालेल यात कसलीच शंका नाही.

'वाँटेड' हा बांगलादेशात प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट होता
खरं तर 'पठाण'च्या आधी सलमान खानचा 'वाँटेड' हा चित्रपट बांगलादेशमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बांगलादेश सरकारने नियमात काही शिथिलता दिली होती. मात्र, स्थानिक चित्रपट संघटनेने चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला. त्यानंतर 50 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला 'वाँटेड' आठवड्याभराच्या आतच हटवण्यात आला होता.

'आशा आहे पठाण बांगलादेशातही लोकांचे मनोरंजन करेल'
पठाणच्या प्रदर्शनापूर्वी YRF इंटरनॅशनल डिस्ट्रिब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसुझा म्हणाले होते की, "चित्रपट ही नेहमीच राष्ट्र, वंश आणि संस्कृती यांच्यात एकीकरण करणारी शक्ती आहे. चित्रपट हे माध्यम सीमा ओलांडते, लोकांमध्ये चेतना जागृत करते आणि एकत्र आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जगभरात अद्वितीय व्यवसाय कमाविणाऱ्या 'पठाण'ला आता बांगलादेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळणार आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो".

बांगलादेशात शाहरुखची मोठी फॅन फॉलोइंग

नेल्सन डिसुझा पुढे म्हणाले, "पठाण' हा बांगलादेशात 1971 नंतर प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे आणि अधिकाऱ्यांच्या निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. शाहरुख खानची बांगलादेशात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे आता बांगलादेशातही हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालणार आहे".

तगडी स्टारकास्ट असलेला 'पठाण'

'पठाण' या चित्रपटात शाहरुखसह दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची झलकदेखील या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

'पठाण' सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट

'पठाण' हा जगात सर्वाधिक कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर तब्बल 1050 कोटींची कमाई केली होती. तर भारतात या चित्रपटाने 545 कोटी कमावले होते. तर ओव्हरसीजमध्ये 396.02 कोटी इतके कलेक्शन केले होते.

'पठाण'ने मोडला 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड

या चित्रपटाने 'बाहुबली 2'चा 6 वर्षे जुना रेकॉर्ड अवघ्या 38 दिवसांत मोडला. 'बाहुबली 2'च्या हिंदी व्हर्जनने 510.90 कोटी लाइफटाइम कलेक्शन केले होतेते. 'बाहुबली 2' हा 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट होता. 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वी वादात सापडला होता. 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळेही वाद निर्माण झाला होता.