आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकने इकॉनॉमी क्लासमध्ये केला प्रवास:कार्तिकला पाहून चाहते झाले थक्क, फ्लाइटमध्ये टाळ्यांचा कडकडाट

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता कार्तिक आर्यन कायम आपल्या चाहत्यांच्या घोळक्यात दिसत असतो. अलीकडेच त्याचा एक नवीन व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने इकॉनॉमी क्लासमध्ये येऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. झाले असे की, नॅशनल यूथ कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होण्यासाठी कार्तिक जोधपूरला पोहोचला होता. परतीच्या वेळी, अभिनेता इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होता, जिथे त्याला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कार्तिकला पाहिल्यानंतर चाहते खूपच एक्साइडेट झालेले दिसले, इतकेच नाही तर लोक त्याच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कार्तिक चाहत्यांचे त्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानताना दिसत आहे. इतकेच नाही तर कार्तिकला पाहून फ्लाइटमध्ये बसलेल्या चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले. कार्तिकचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. व्हिडिओ पहा-

बातम्या आणखी आहेत...