आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दीवाना था:वयाच्या तिसऱ्या वर्षी कॅमेऱ्यासमोर, 67 वर्षांच्या आयुष्यात 63 वर्षे पडद्यावर; 2000 नंतर 45 हून जास्त चित्रपटांत अभिनय

 मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आजोबा पृथ्वीराज कपूर, बहीण ऋतू नंदांप्रमाणेच कर्करोगाशी झुंज देताना ऋषी कपूर यांचे निधन
 • मुलगी रिद्धिमा अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहू शकली नाही, दिल्लीतून 1400 किमी अंतरावरील मुंबईकडे निघाली

रोमँटिक आणि सदाबहार अभिनेते ऋषी कपूर (67) यांचे गुरुवारी निधन झाले. ऋषी गेल्या दोन वर्षांपासून ल्युकेमियाशी (ब्लड कॅन्सर) झुंज देत होते. श्वसनास त्रास होत असल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारीच इरफान खान यांचे कर्करोगाने निधन झाले.

ऋषी कपूर यांची कन्या रिद्धिमा दिल्लीत होती, मात्र लॉकडाऊनमुळे चार्टर्ड विमानाला परवानगी न मिळाल्याने ती अंत्यसंस्कारावेळी अनुपस्थित होती. ती 1400 किमी अंतराच्या प्रवासासाठी रस्ता मार्गे मुंबईकडे रवाना झाली. ऋषी यांचे पार्थिव रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत नेण्यात आले. सायंकाळी 4 च्या सुमारास विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ऋषी यांना 2018 मध्ये कर्करोग झाल्याचे लक्षात आले होते. त्यांनी एक वर्ष न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले होते.

शोमन राज कपूरच्या घरी जन्मला ऋषी तारा
‘श्री 420’ मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी कॅमेऱ्यासमोर. प्यार हुआ इकरार हुआ... या गाण्यात ऋषी आपल्या भावंडांसह काही सेकंद दिसले होते. पावसातले दृश्य होते आणि ऋषी सतत डोळे बंद करायचे. नर्गिस यांनी चॉकलेट देऊन त्यांना समजावले होते. 18 व्या वर्षी ‘मेरा नाम जोकर’मध्ये अभिनय केला. त्यासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवड.

 • 67 वर्षांच्या आयुष्यात 63 वर्षे पडद्यावर

त्यांनी 155 हून जास्त चित्रपट केले. तिसऱ्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास 67 व्या वर्षांपर्यंत राहिला. बालकलाकार, मुख्य नायक आणि चरित्र अभिनेता अशा भूमिका वठवल्या. 1973 ते 2000 या काळात 92 चित्रपटांत नायक. 36 सुपरहिट राहिले. नायक म्हणून ‘बॉबी’ या पहिल्याच चित्रपटासाठी 1974 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.

 • 2000 नंतर 45 हून जास्त चित्रपटांत अभिनय

2000 नंतर 45 पेक्षा जास्त चित्रपटांत चरित्र भूमिका केल्या. लव्ह आजकल, अग्निपथ, मुल्कसारखेही चित्रपट केले. ‘दो दुनी चार’ साठी फिल्मफेअर बेस्ट क्रिटिक अॅक्टर अवॉर्ड मिळाला. 2016 मध्ये ‘कपूर अँड सन्स’साठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, 2008 मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यांचा ‘द बॉडी’ हा शेवटचा चित्रपट 2019 मध्ये आला होता.

 • 28 व्या वर्षी नीतूशी लग्न, 12 चित्रपटांत एकत्र काम केले

ऋषी कपूर यांनी 1980 मध्ये अभिनेत्री नीतू सिंगशी लग्न केले. दोघांनी 1973 - 1980 या काळात  12 चित्रपट केले. या जोडीला पसंती मिळाली. दोघांचे अनेक चित्रपट हिट राहिले.

टॉप चित्रपट

 • बॉबी (1973)
 • खेल खेल में (1975)
 • कभी कभी (1976)
 • अमर अकबर अँथनी (1977)
 • सरगम (1979)
 • कर्ज (1980)
 • प्रेमरोग (1982)
 • चांदनी (1989)
 • हीना (1991)
 • बोल राधा बोल (1992)
 • मुल्क (2018)
बातम्या आणखी आहेत...