आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरल्या फक्त आठवणी:इरफान खानच्या आठवणीत पत्नी सुतापाने लिहिले... ‘हा पाऊस आम्हाला एकमेकांशी जोडत आहे’

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुतापाने, इरफान खानचा नदीच्या किनाऱ्यावरील एक फोटाे शेअर केला आहे.

अभिनेता इरफान खान जाऊन एक महिना झाला आहे. त्याच्या आठवणीत त्याची पत्नी सुतापा सिकदर आणि मुले दररोज त्याच्याशी संबंधित पोस्ट शेअर करतात. अलीकडेच मुंबईत झालेल्या पहिल्या पावसात सुतापाला पती इरफानची आठवण आली. तिने काही नवीन-जुने फोटो शेअर करून इरफानच्या पावसाशी संबंधित आठवणी सांगितल्या. 

सुतापाने लिहिले, ‘तुझे आभार, मी तुला ऐकू शकते. हो, मला माहीत आहे, हे तुझ्याकडून माझ्यासाठी आहे. याने माझ्या शरीर आणि मनाला स्पर्श केला आहे. आपल्या दोघांना जोडण्यासाठी हा पाऊसच आहे.’  सुतापाने, इरफान खानचा नदीच्या किनाऱ्यावरील एक फोटाे शेअर केला आहे.

यापूर्वीही लिहिली आहे भावूक पोेस्ट.. 

इरफान खानला या जगाचा निरोप घेऊन 29 मे रोजी एक महिना पूर्ण झाला.  सुतापाने त्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर काही छायाचित्रे आणि एक भाविनक नोट शेअर होती. सुतापाने लिहिले होते, 'येथून खूप दूर... चुक आणि बरोबरच्याही खूप पुढे एक सुंदर रिकामे मैदान आहे. जेथे आपला आत्मा गवतावर शांतपणे विश्रांती घेत असेल आणि जगाच्या गप्पा मारुन थकले असेल. ही फक्त काही काळाची बाब आहे. भेटू… बोलू… पुन्हा भेट होईपर्यंत... सुतापाने इरफानबरोबरचा जो फोटो शेअर केला होता तो या दोघांचा सेल्फी होता. 

कोलोन संसर्गामुळे झाला मृत्यू: इरफानने 29 एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुमारे आठवडाभरापूर्वी कोलोनच्या संसर्गामुळे त्याला तेथे दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. 13 मार्च रोजी रिलीज झालेला 'अंग्रेजी मीडियम' हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे.

इरफान न्यूरोएन्डोक्राइन कर्करोगाशी झुंज देत होता: मार्च 2018 मध्ये इरफान खान न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमरच्या उपचारांसाठी लंडनला गेला होता. तो तेथे जवळपास एक वर्ष राहिला आणि बरे झाल्यानंतर एप्रिल 2019 मध्ये भारतात परतला होता. परत आल्यानंतर त्याने राजस्थानमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर पुढील शेड्युलसाठी लंडनला गेला, तिथेही तो डॉक्टरांच्या संपर्कात होता. त्यानंतर तो अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला येणेजाणे करत राहिला. मात्र, लॉकडाऊनमुळे तो मुंबईबाहेर जाऊ शकला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...