आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जस्ट मॅरिड:‘स्कॅम 1992’मध्ये फेम अंजली अडकली लग्नाच्या बेडीत, लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत म्हणाली - ‘रिस्क है तो इश्क है’

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नववधूच्या रुपात अंजली अतिशय सुंदर दिसतेय.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम 1992’ ही वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री अंजली बरोट नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. बॉयफ्रेंड गौरव अरोरासोबत अंजलीने 16 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. अंजली आणि गौरव बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले आहे.

अंजलीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे. अंजलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्री वेडिंग पासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत. नववधूच्या रुपात अंजली अतिशय सुंदर दिसतेय. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

यापूर्वी अंजलीने मेहेंदी समारंभातील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने ‘रिस्क है तो इश्क है’ असे कॅप्शन दिले होते

‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये अंजलीने हर्षद मेहताची पत्नी ज्योतीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.

बातम्या आणखी आहेत...