आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण:सुशांतच्या मृत्यूच्या तपासावर शेखर सुमन म्हणाले- सीबीआय, एनसीबी आणि ईडी पुरावा नसल्यामुळे असहाय आहेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेखर यांनी दोन दिवसांपूर्वी पोस्ट टाकली होती

अभिनेता शेखर सुमन यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीवर निराशा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी), सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) सारख्या संस्था पुरावे नसल्यामुळे असहाय्य झाल्या आहेत. 14 जून रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या हत्येची शक्यता व्यक्त करत त्याच्या खात्यातील पैशांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडीकडे गेला. काही दिवसांनी या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून ड्रग्ज कनेक्शन समोर आले आणि एनसीबीनेही या प्रकरणाचा तपास सुरु केला.

शेखर यांनी दोन दिवसांपूर्वी पोस्ट टाकली होती
शेखर सुमन यांनी तपास यंत्रणेच्या चौकशीसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. ते म्हणाले, "मला वाटते की सीबीआय, ईडी आणि एनसीबीने तपास, अटक आणि चौकशीसाठी निःपक्षपातीपणे काम केले आहे. मात्र कोणतेही पुरावे नसल्याने तपास यंत्रणा असहाय्य झाल्या आहेत, असे मला वाटते."

काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता संताप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचेच प्रकरण असल्याचे एम्सच्या विशेष पथकाने गेल्या महिन्यात सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले होते. ऑक्टोबर महिन्यात एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला होता. यावेळी शेखर सुमन यांनी एम्सच्या रिपोर्टवर आपला राग व्यक्त केला होता. सुशांत प्रकरणाचीही गळा दाबून हत्या करण्यात आली, असे त्यांनी म्हटले होते. सुशांत प्रकरण वेगळ्याच वळणावर जात असून, त्यात त्याला न्याय मिळत नसल्याचे म्हणत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले होते. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत थेट तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. सर्वकाही आधीच निश्चित झाले होते, असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला होता.

या महिन्याच्या सुरुवातीलादेखील त्यांनी म्हटले होते की, बिहारमधील राजकारणासाठी सुशांत मृत्यू प्रकरणाचा मी वापर करत असल्याच आरोप ज्यांनी ज्यांनी केला होता, त्या प्रत्येकाने माफी मागायला हवी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser