आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:बदलत्या बॉलीवूडमध्ये नेहमीच्या ठोकळेबाज भूमिकांतून मुक्त होत महिलांना मिळताहेत सडेतोड, स्वतंत्र अन् सशक्त भूमिका

न्यूयॉर्क (प्रिया अरोरा)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकत्याच प्रदर्शित चित्रपटातून रुपेरी पडद्यावर महिलांची प्रतिमा सक्षम होत असल्याचे सिद्ध

‘त्याग करण्यासाठीच महिलांचा जन्म असतो...’ हा संवाद १९९५ मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातला आहे. त्यातील नायिका सिमरन एकावर प्रेम करते, मात्र तिचे लग्न तिसऱ्याच मुलाशी ठरवले जाते. तेव्हा तिची आई म्हणते की, वडिलांच्या इच्छेसाठी तिने प्रेमाचा त्याग केला पाहिजे. बॉलीवूडमध्येही महिलांना पडद्यावर अशाच प्रकारचा त्याग करावा लागलेला आहे. रुपेरी पडद्यावर दीर्घकाळापर्यंत महिलांना पितृसत्तात्मक दबावाखाली झुकणाऱ्या गृहिणी म्हणून दाखवले गेले आहे. मात्र आता चित्र बदलत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपटांत आई व महिला त्यांच्या वास्तवदर्शी व दमदार भूमिकेत दाखवल्या आहेत. बनावट व दिखाऊ भूमिकांऐवजी त्यांना सडेतोड, स्वतंत्र व स्वत:चे भविष्य स्वत: घडवणाऱ्या सशक्त महिला म्हणून चितारण्यात आले आहे. रेणुका शहाणे दिग्दर्शित ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘त्रिभंग’ असाच चित्रपट आहे. मुख्य पात्र अनुराधा (काजोल) ही नृत्यांगना आहे. आई नयनतारामुळे (तन्वी आझमी) तिला भूतकाळातील अनुभवांना सामोरे जावे लागते. हा चित्रपट बॉलीवूडच्या टिपिकल विषयांऐवजी एकेरी मातृत्व, शोषण व मुक्त नात्यांची चर्चा करतो. शहाणे यांनी पटकथेवर ६ वर्षे काम केले. त्या म्हणाल्या, महिलांना किचकट स्वरूपात दाखवणे कठीण होते. नुकतेच आलेला ‘शकुंतला देवी’ किंवा २०१९ मधील ‘डॉली, किट्‌टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटांतून सिद्ध होते की बॉलीवूड आता कात टाकत आहे. दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव म्हणाल्या, याचे श्रेय इंडस्ट्रीतील महिलांनाच जाते. अभिनेत्री काजोल म्हणते, आपण एक देश म्हणून ‘आई’ची भूमिका चाकोरीबद्ध पद्धतीने मांडतो. मात्र ही विचारसरणी अपयशाला जन्म देते. महिलांना त्या ऑन किंवा ऑफस्क्रीनवरही मर्यादित ठेवते. आपण परफेक्ट आई बनू शकतो, हे कधीही पूर्ण न होणारे स्वप्न आहे. मात्र बॉलीवूड अशा पद्धतीच्या चित्रपटांतून हा दृष्टिकोन बदलू शकते.

१९५७ मधील ‘मदर इंडिया’ चित्रपटात दिसली होती या बदलांची झलक
युनिव्हर्सिटी ऑ‌फ कॅलिफोर्नियात एशियन-अमेरिकन स्टडीजच्या प्राध्यापक बेहरोज श्रॉफनुसार, १९५० च्या दशकात या बदलाची झलक दिसली होती. १९५७ मधील ‘मदर इंडिया’ चित्रपटात कर्तव्ये व देशासाठी कटिबद्ध असलेल्या आदर्श आईला देशाची लेक म्हणून सादर केले होते. मात्र १९९० च्या दशकात भांडवलशाहीमुळे प्रेक्षकांचे वेगळ्या प्रकारे प्रबाेधन करण्याची गरज होती. यामुळे महिलांना वास्तवदर्शी रूपात दाखवावे की कर्तव्यनिष्ठ रूपात, ही चर्चा सुरू झाली होती

बातम्या आणखी आहेत...