आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकतेच कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचे एक धक्कादायक छायाचित्र समोर आले आहे. छायाचित्रात तिच्या उजव्या बाजूचा चेहरा पुर्णपणे खराब झाला आहे. स्वातीवर नुकतीच रूट कॅनाल सर्जरी करण्यात आली होती, या शस्त्रक्रियेतील निष्काळजीपणामुळे अभिनेत्रीचा चेहरा खराब झाला आहे. सुमारे 20 दिवस तिचा चेहरा सुजलेला होता. सुरुवातीला, हा शस्त्रक्रियेचा परिणाम आहे, असे स्वातीला वाटले होते. परंतु जेव्हा कोणतीही सुधारणा होत नाही तेव्हा तिने डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. एखाद्या अभिनेत्रीचा चेहरा शस्त्रक्रियेने खराब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्लास्टिक सर्जरीमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याला खूप इजा झाल्याचेही अनेकवेळा पाहायला मिळाले, तर सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
कोएना मित्रा
2004 मध्ये आलेल्या 'मुसाफिर' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कोएना मित्रा हिचा चेहरा आणि करिअर शस्त्रक्रियेमुळे उद्ध्वस्त झाले आहे. कोएनावर 2011 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे तिचा चेहरा खराब झाला होता. एका मुलाखतीदरम्यान कोएनाने सांगितले होते की, शस्त्रक्रियेनंतर तिच्या हाडांना सूज येऊ लागली. डॉक्टरांनी नंतर हात वर केले आणि सांगितले की आता फक्त प्रार्थनाच काम करू शकते. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडल्यानंतरही अभिनेत्री चित्रपटांमध्ये दिसली, परंतु जेव्हा लोकांनी तिच्यावर अश्लील कमेंट्स केल्या तेव्हा तिने स्वतःला प्रसिद्धीपासून दूर केले. कोएनाने घराबाहेर पडणेही जवळजवळ बंद केले होते.
रॅजा विल्सन
तामिळ अभिनेत्री रॅजा विल्सनची चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेमुळे प्रकृतीही बिघडली आहे. चेहऱ्यावरील किरकोळ उपचारासाठी रॅजा कॉस्मेटोलॉजिस्टकडे गेली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला चेहऱ्याची दुसरी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर लगेचच तिच्या डोळ्यांखाली गंभीर सूज आली. त्यासाठी ती पुन्हा डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला भेटण्यास नकार दिला होता.
आएशा टाकिया
टारझन, वाँटेड सारख्या हिट चित्रपटात दिसलेली आयशा टाकिया हिचीही शस्त्रक्रिया बिघडली आहे. आएशाचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिचे ओठ खूप सुजलेले दिसत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्यावर बोटॉक्स देखील केले होते, ज्यामुळे तिचा चेहरा सुजलेला दिसत होता.
राखी सावंत
राखी सावंतने काही चित्रपटांनंतर नाक-ओठांची शस्त्रक्रिया केली होती. याशिवाय तिने ब्रेस्ट इम्प्लांटेशन देखील करुन घेतले होते. पण शस्त्रक्रियेनंतर राखीचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. बिग बॉस 15 चा भाग असताना राखी खूप रडली होती. तिने सांगितले होते की, ब्रेस्टवर दाब आल्याने तिचे इम्प्लांटेशन बिघडले आहे. इमोशनल झालेली राखी म्हणाली होती की, सुरुवातीला तिने या शस्त्रक्रिया सौंदर्यासाठी केल्या होत्या, पण आता तिचा नाईलाज झाला आहे.
सौंदर्याच्या हव्यासापोटी या सेलिब्रिटींचा झाला मृत्यू
मिष्टी मुखर्जी
सडपातळ दिसण्याच्या इच्छेपोटी बंगाली अभिनेत्री मिष्टी मुखर्जीनेही आपला जीव गमावला. मिष्टीने वजन कमी करण्यासाठी केटो डाएट घेतला होता, पण त्यामुळे तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि तिचा मृत्यू झाला.
राकेश दिवाना
'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या अनेक शोचा भाग असलेल्या राकेश दिवानाला त्यांच्या लठ्ठपणामुळे एक वेगळी ओळख मिळाली होती, पण त्यांना सडपातळ व्हायचे होते. वजन कमी करण्यासाठी राकेश यांनी लिपोसक्शन शस्त्रक्रिया केली होती, पण शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार दिवसांनी त्यांचे निधन झाले होते.
आरती अग्रवाल
दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री आरती अग्रवाल हिचा लिपोसक्शन सर्जरीदरम्यान मृत्यू झाला. आरतीचे वजन खूप वाढले होते, त्यामुळे तिला काम मिळणे कठीण झाले होते. सडपातळ दिसण्यासाठी आरती अमेरिकेतील रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी गेली होती. शस्त्रक्रियेदरम्यानच 6 जून 2015 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला होती. मृत्यूवेळी आरती केवळ 31 वर्षांची होती, ती सुमारे 25 साऊथ चित्रपटांमध्ये झळकली. तिचा शेवटचा चित्रपट 'रानम 2' तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी प्रदर्शित झाला होता.
चेतना राज
कन्नड अभिनेत्री चेतना राजची सुंदर दिसण्याची इच्छा तिला मरणाच्या दारात घेऊन गेली. मे 2022 मध्ये, चेतना चरबी काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाला होती. परंतु शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. चेतना फक्त 21 वर्षांची होती, ती तिच्या आई-वडिलांना न सांगता शस्त्रक्रियेसाठी गेली होती. चेतनाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रिया उपकरणांशिवाय बेकायदेशीरपणे केली गेली, ज्यामुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.